आपणास माहिती आहे का की टोमॅटो ही भाजी नसून गर असलेले फळ आहे. टोमॅटोचा वापर आपण विविध प्रकारे करतो, कधी आपण तो कच्चाच खातो तर कधी एखाद्या पदार्थात वापरतो किंवा टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार करून जसे की टोमॅटो सॉस, टोमॅटो ज्यूस, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो सूप किंवा केचप, तर काही वेळा डब्यात साठवलेले (canned) टोमॅटो वापरतो तर कधी सन ड्राइड टोमॅटोचा वापर करतो.
टोमॅटोत आढळणारे अन्नघटक
पाणी व मीठ सोडल्यास प्रत्येकच पदार्थ आपल्याला कमी जास्त प्रमाणात कॅलरीज देतात, अगदी मसाले सुद्धा, पण इतर पदार्थांच्या तुलनेत टोमॅटो मध्ये कॅलरीजचे प्रणाम कमी आढळते -18 कॅलरीज/100 ग्रॅम. ह्यात मीठ, सॅच्युरेटेङ फॅटचे प्रमाण तुलनेत कमी असते. कोलेस्टरॉल जे रक्तातील चरबी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात ते तर ह्यात अजिबातच नसते. जीवनसत्व ई (tocopherol), थायमिन, नायासिन, जीवनसत्व ब6, फोलेट, मॅग्नेशियम, फाॅसफरस, काॅपर, ही खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात. तर जीवनसत्व अ, क, आणि के तसेच पोटॅशियम, मॅगेनिज, ही खनिजे आणि तंतुमय भाग (dietary fiber), उत्तम प्रमाणात आढळतात. Lycopene आणि zea-xanthin ही अॅटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात आढळतात. Carotenoid, lycopene बरोबर आढळणाऱ्या इतर घटकांमुळे पेशींचे रक्षण तर होतेच पण शरीरात तयार होणार्या पण आरोग्याला घातक ठरू शकणार्या oxygen free radicals पासून ही ते संरक्षण करतात. टोमॅटोत Total Oxygen Radical Absorbance Capacity – ORAC 367mol TE/100g आढळते. अशा सर्व प्रकारच्या अन्नघटकांच्या concentration मुळे आपले आरोग्यसुद्धा सुरक्षित राहण्यास टोमॅटोचे सेवन मोलाची मदत करतात. टोमॅटोचा लाल रंग हा त्यात आढळणाऱ्या lycopene ह्या अॅटीऑक्सीडंट मुळे असतो.
Lycopene हे अॅटीऑक्सीडंट आपला रोगांपासून ही बचाव करते. प्रयोगात असे आढळले आहे कि दिवसाला एक कप कापलेल्या किंवा चकत्या केलेले टोमॅटो किंवा 20 छोटे चेरी टोमॅटो घेतल्यास रक्तातील lycopeneच्या पातळीत वाढ झालेली आढळली. तसेच टोमॅटो जेव्हा शिजवला जातो, तेव्हा जास्तीतजास्त lycopene शरीराला उपलब्ध झालेले आढळले आणि जेव्हा टोमॅटोचे पदार्थ थोड्याशा तेलाबरोबर घेतल्यास टोमॅटोत आढळणाऱ्या lycopeneचा वापर चांगल्या प्रकारे झालेला आढळला. टोमॅटोच्या पदार्थांचे सेवन रोजच्या रोज केल्याने दीर्घकालीन (chronic) रोगांचे प्रमाण ही कमी झालेले आढळले. शास्त्रज्ञांच्या मते एकट्या lycopene एवजी टोमॅटोत आढळणाऱ्या इतर अन्नघटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आपले आरोग्य सुरक्षित राहण्यास व रोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
टोमॅटोच्या सेवनाने आरोग्यास होणारे फायदे
— वजन घटवण्यास मदत करते कारण fullness factor ( पोट पूर्ण भरल्या सारखे वाटते)
— लागण होणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करणे
— सिगरेट ओढल्याने शरीरात तयार होणार्या carcinogenic (कर्क कारक) घटकांचा बचाव करण्याचे काम टोमॅटोतील coumaric acid आणि chlorogenic acid करतात.
— रक्तात आढळणारे हानिकारक घटक ( free radical) neutralize (निरस्तभेद) करणे
— बिया शिवाय टोमॅटोचे सेवन केल्याने kidney stones (मूतखडा) चे प्रमाण कमी झाल्याचे काही प्रयोगात आढळले आहे
— टोमॅटोतील जीवनसत्व अ हे तुमचे केस चमकदार व मजबूत होण्यास मदत तर करतातच पण डोळे, त्वचा, हाड, व दातांसाठी आश्चर्यजनक मदत करताना दिसतात.
— त्रासदायक असणाऱ्या ultraviolet (UV ) rays शोषून घेऊन वृद्ध व्यक्ती मधे डोळ्यात आढळणाऱ्या “Age related macluar disease” नावाच्या रोगापासून बचाव करतात
— UV rays पासून त्वचेचा बचाव केल्याने थोड्या प्रमाणात का होईना त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करतात
— शरीरा अंतर्गत सूजेमुळे ह्रदयरोग कर्करोग, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाईप 2 प्रकारचा मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, periodontal रोग, संधिवात, neurological degenerative रोग, तसेच irritable bowel disorder (IBS) ह्या समस्या उदभवू शकतात, पण टोमॅटोच्या सेवनाने ही अंतर्गत सूज कमी झाल्याने अंतर्गत सूजेमुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण येऊ शकते
— टोमॅटोच्या सेवनाने बर्याच प्रकारच्या कर्करोगाची बाधा होण्याचा धोका कमी होतो – टोमॅटोत आढळणाऱ्या अॅटी कॅन्सर गुणधर्माचे प्रमाण हे त्यात आढळणाऱ्या अॅटीऑक्सीडंट च्या मुख्यत्वे lycopene beta-carotene च्या प्रमाणावर अवलंबून आहे
— प्रयोगात असे आढळले आहे कि जर 1 सर्व्हिंग टोमॅटोचे सेवन दररोज केल्यास DNA ला अपाय होण्यापासून बचाव होतो, पण हाच फायदा नुसते lycopene च्या supplementation ने मिळताना दिसत नाही. हे DNA damage prostate cancer धोका वाढवतात.
— टोमॅटोचा वापर हा स्तनांचा कर्करोग, मूत्राशय चा कर्करोग, गर्भाशय, colon and rectum, stomach (पोटाचा कॅन्सर), lungs (फुफुस), ovaries (बीजकोश), pancreas (स्वादुपिंड) आणि prostate ह्या प्रकारच्या कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते.
— टोमॅटो आणि ह्रदय रोग – रक्तातील lycopene ची पातळी वाढली असल्यास ह्रदय रोगाचा धोका कमी होऊ शकतो. Atherosclerosis च्या सुरुवातीच्या टप्प्यातच रक्तातील lycopene ची पातळी वाढली असल्यास ह्रदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत होते
— EURAMIC प्रयोगात काही आढळणाऱ्या गोष्टींचा शास्त्रज्ञानी अभ्यास केला तेव्हा त्यांना असे आढळले की ह्रदयाच्या संरक्षणात lycopene हा महत्त्वाचा घटक ठरतोय.
— Israeli शास्त्रज्ञांना टोमॅटो रिच आहाराचे सेवन केले असता रक्तातील चांगले कोलेस्टरॉल 15.2% वाढलेले आढळले.
— British Journal of Nutrition मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात असे नमूद केले आहे की टोमॅटो चे पदार्थ जसे की टोमॅटो सॉस व टोमॅटो ज्यूसचे सेवन दररोज केल्यास रक्तातील वाईट कोलेस्टरॉल 13% पर्यंत कमी होऊ शकेल
— एप्रिल 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रयोगात असे आढळले आहे कि मध्यम वयाच्या स्त्रियांमध्ये टोमॅटो ज्यूस चे सेवन केल्याने मासिकपाळी थांबल्यानंतर होणारे त्रास, चिंता, Resting Energy Expenditure (REE) मध्ये वाढ, हार्ट रेट मध्ये वाढ, आणि आधाररेखा (baseline) triglycerides TG रक्तातील एक प्रकारची चरबी कमी होऊ शकते.
— ह्यातील पोटॅशियम च्या प्रमाणामुळे मिठाच्या सेवनामुळे होणारे ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी, तसेच हार्ट रेट मध्ये बदल घडवण्यात मदत करतात
— ब्लडप्रेशरवर नियंत्रण सुधारल्याने स्ट्रोक चा त्रास कमी होऊ शकतो
— प्रयोग असे दाखवतात कि प्रकटित (processed) टोमॅटोच्या सेवनाने रक्तातील सी रिआक्टिव प्रोटिन (इनफ़्ल्मेट्रि मार्कर) चे प्रमाण कमी झाल्याचे आढळले.
— धावपटूंनी नित्यनियमाने टोमॅटो एवजी टोमॅटो ज्यूस चे सेवन केल्यास व्यायाम केल्याने गेलेली शक्ति लवकर परत मिळवण्यास पुनरप्रापती मदत होते
— साधा थंडी ताप बरा करण्यास काही जण टोमॅटोचा वापर करतात
काही विशेष सूचना (tips)
— टोमॅटो शिजवताना अॅल्युमिनीयम च्या भांड्यांचा वापर करू नये असे सांगितले जाते कारण ह्यात शिजवलेल्या टोमॅटोच्या सेवनाने neurodegenerative रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ Alzhiemer
— सर्व साधारणतः टोमॅटोचे सेवन सुरक्षित मानले जाते पण काही जणांना ह्याच्या सेवनाने त्रास होऊ शकतो जसे की टोमॅटोत आढळणाऱ्या अॅसिडमुळे Gastro Esophegeal Regurgitation (GERD) चा त्रास असणाऱ्या व्यक्तींना छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो
— ज्या व्यक्तीला टोमॅटो पचत नाही आशा व्यक्तिने टोमॅटोच्या पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास त्यांना पचनाचा त्रास होऊ शकतो
— डबा बंद टोमॅटोत मीठाचे प्रमाण जास्त असल्याने अतिमीठाच्या सेवनाने होणारे त्रास उदभवू शकतात
Leave a Reply