नवीन लेखन...

प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले. पॉलिस्टायरिनचा शोध जरी १८३९ साली लागला असला तरी त्याचे व्यापारी तत्त्वावरचे उत्पादन १९३७ साली डाऊ कंपनीने “सुरू केले.

स्टायरिन द्रवरूप असते. स्टायरिन हे बेंझिन आणि इथिलीनपासून बनवले जाते. पॉलिस्टायरिन कडक आणि पारदर्शक प्लास्टिक आहे. पॉलिस्टायरिनला उत्तम विद्युत गुणधर्म आहेत. सूर्यप्रकाशात हे किंचित पिवळे पडते. मूळ स्वरूपात हे अत्यंत ठिसूळ प्लास्टिक असून त्याची आघात सहन करण्याची शक्ती कमी असते.

पॉलिस्टायरिन उष्णतेला टिकणारे, रसायनांना टिकणारे असते. ते काचतंतू घातलेल्या स्वरूपातही मिळू शकते. पॉलिस्टायरिनपासून इंजेक्शन मोल्डिंग पद्धतीने वस्तू बनवता येतात. तसेच काही एका विशिष्ट पद्धतीने तक्ते, पातळ फिल्म किंवा पोकळ बाटल्या बनवता येतात. हे कडक आणि पारदर्शक प्लास्टिक असल्याने यापासून खिडक्यांच्या काचा, उपकरणाची आवरणे, भिंगे, डायल इंडिकेटर्स इत्यादी वस्तू बनवता येतात.

पॉलिस्टायरिनमध्ये ब्युटाडाइन रबर मिसळल्याने अशा प्लास्टिकची आघात सहन करण्याची ताकद वाढते. ह्या प्लास्टिकला हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरिन म्हणतात. या प्लास्टिकमध्ये किती प्रमाणात ब्युटाडाइन रबर मिसळले त्यावर त्याची आघात सहन करण्याची क्षमता कमी, मध्यम आणि उच्च अशी अवलंबून असते. हे प्लास्टिक बऱ्यापैकी ताणलेही जाते. क्षीण आणि तीव्र अल्कलीचा यावर परिणाम होत नाही, पण तीव्र अॅसिडचा यावर परिणाम होतो. हे संपूर्णपणे पारदर्शक नाही पण पातळ स्वरूपात ते अर्धपारदर्शक असते. अशा प्लास्टिकचा उपयोग रेडिओ, दूरचित्रवाणी संचांच्या केसेससाठी, बटणे आदींसाठी करतात.

-अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..