MENU
नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ९

Religions in America - Part 9

संख्येने तुलनात्मक रित्या कमी असूनही, अमेरिकेच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर फार मोठा प्रभाव टाकणारे म्हणजे ज्यू. तसे ज्यू अमेरिकेत १७ व्या शतकापासून होते. परंतु त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ती १९ व्या आणि २० व्या शतकातल्या, मध्य आणि पूर्व युरोपातील वंशद्वेषी अत्याचारांमुळे. या अत्याचारांतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ज्यू अमेरिकेकडे धाव घेऊ लागले. आज अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांमधे ते पसरले असले तरी अमेरिकेतील एकूण ज्यू समाजापैकी सुमारे २५% ज्यू एकट्या न्यूयॉर्क शहरात एकवटले आहेत.

आपल्या बुद्धिमतेच्या आणि व्यापारी वृत्तीच्या बळावर गेल्या शतकात ज्यू लोकांनी अमेरिकेवर आपली छाप पाडली आहे. नोबेल पारितोषिक मिळवलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञांपैकी तब्बल १/३ – ३७% शास्त्रज्ञ ज्यू आहेत. अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स, प्राध्यापक, वकीलांबरोबरच, अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या बोर्डांवर देखील ७.७% डायरेक्टर्स ज्यू आहेत. हॉलिवूडमधे MGM सारख्या प्रख्यात स्टुडिओच्या मालकांपासून ते अनेक जगप्रसिद्ध दिग्दर्शक आणि सितारे-सिनेतारका ज्यू आहेत. वित्तीय क्षेत्रामधे तर ज्यूंची कर्तबगारी आणखीनच अचंबित करणारी आहे. आपल्या रिझर्व बॅंकेप्रमाणे, अमेरिकेतली मध्यवर्ती बॅंक म्हणजे फेडरल रिझर्व. ही ८ ज्यू बॅंकांची मिळून बनलेली आहे. या बॅंकेचे शेवटचे दोन चेअरमन (ऍलन ग्रीनस्पॅन आणि बेन बर्नानके) ज्यूच होते/आहेत. ११ सप्टेंबर २००१ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष बुश यांनी निर्माण केलेल्या होमलॅंड सिक्युरीटी या प्रशासन व्यवस्थेचे सर्वेसर्वा देखील ज्यू आहेत. राज्यस्तरावरील कोर्टांमधे तसेच सुप्रीम कोर्टामधे, ज्यू न्यायाधिशांचं प्रमाण लक्षात येण्याएवढं मोठं आहे. अमेरिकेतील ज्यू लोकांची एकजूट मोठी लक्षणीय आहे आणि विविध क्षेत्रांमधील त्यांच्या प्रभावाचा एकत्रित विचार केला तर, ह्या तुलनेने छोट्या समूहाची ताकद समजून येते.

अमेरिकन जीवनाच्या विविध अंगांवर एवढा प्रभाव पाडणारी ही ज्यू लॉबी, आपले खरे सामर्थ्य दाखवते ते अमेरिकन राजकारणावर. तशी पारंपारिक रित्या ज्यू समाजाची एकगठ्ठा मतं डेमॉक्रॅटिक पार्टीला मिळत आलेली आहेत. परंतु डेमॉक्रॅटिक तसेच रिपब्लिकन, दोन्ही पक्षांच्या आर्थिक नाड्या, मोठ्या प्रमाणात ज्यू लॉबीच्या हातात आहेत. कोणाही राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला, ज्यू लॉबीचा रोष पत्करणे परवडण्यासारखे नसते. आज अमेरिकेच्या सिनेटमधे १०० पैकी १५ सिनेटर्स तर ४३५ यु. एस. रेप्रेझेंटेटीव्हस्‌ पैकी ३० ज्यू आहेत. सन २००० साली ज्यो लिबरमन हे ज्यू गृहस्थ, डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे उपाध्यक्षपदासाठी उभे राहीले होते. आजवर कोणीही ज्यू अमेरिकेचा उपाध्यक्ष वा अध्यक्ष झालेला नाही, परंतु एकंदर अमेरिकन अर्थकारण, समाजकारण आणि विशेषत: राजकारणावर असलेली ज्यू लॉबीची जबरदस्त पकड बघितली आणि त्याद्वारे अमेरिकेच्या अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांना ते कसे वळण देऊ शकतात हे बघितले, की आश्चर्य वाटल्या शिवाय रहात नाही.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..