प्रख्यात भजन गायक नरेंद्र चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० रोजी अमृतसरमध्ये झाला.
नरेंद्र चंचल हे भजन गाण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाण्यांना आवाज दिला होता.
नरेंद्र चंचल यांचा जन्म अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, त्यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे. त्यांची आई त्यांची पहिली गुरु होती. त्यानंतर त्यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते.
नरेंद्र चंचल यांनी १९७३ मध्ये ऋषी कपूर यांच्या ‘बॉबी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये गायकीमध्ये पदार्पण केलं होतं. बॉबी या चित्रपटातील गाण्यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. बॉबी चित्रपटानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७४ मध्ये बेनाम और रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी गाणी गायली होती. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई नावाचं गाणं गायलं होतं. तसेच आशा या चित्रपटातील ‘चलो बुलावा आया है माताने बुलाया है…’ या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले.
याशिवाय त्यांनी १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत. यानंतर त्यांनी आपल्या भजनांनी बरंच नाव कमावलं. त्याच्याकडे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही होते. काही दिवसांपूर्वी ते करोनावर ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणे गाताना ते व्हिडिओत दिसले होते. आणि हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
नरेंद्र चंचल यांचे २२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले.
नरेंद्र चंचल यांनी गायलेली भजने.
https://www.youtube.com/watch?v=6AKcsiGswx4
नरेंद्र चंचल यांनी गायलेली चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=HLixPkDCIto
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply