केनेथ फ्रॅंक बॅरिंग्टन यांचा जन्म २४ नोव्हेंबर इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील ब्रिटिश आर्मी मध्ये सैनिक होते. तेथे त्यांनी २८ वर्षे सर्व्हिस केली. त्यांना सैनिक असताना पहिल्या महायुद्धामध्ये आणि नंतर अनेक पदके मिळाली होती. त्यांची मुले त्यावेळी त्यांच्याबरोबर सरकारी बरॅकमध्ये रहात होती. त्यांच्या वडिलानी म्हणजे पर्सी बॅरिंग्टन यांनी १९४७ मध्ये आर्मी सोडली आणि ते ते एका कंपनीमध्ये वॉचमनचे काम करू लागले. पर्सी यांना स्वतःला क्रिकेटची खूप आवड होती, ते त्यांच्या रेजिमेंट टीमकडून क्रिकेट खेळत असत ते ऑल-राउंडर होते. ते त्यांच्या मुलांना क्रिकेट कसे खेळाचे हे शिकवत असत.
केन बॅरिंग्टन हे वयाच्या ११ व्या वर्षी शाळेमधील क्रिकेट टीम मधून जलद गोलंदाज आणि फलंदाज म्हणून खेळू लागले. सुरवातीला ते रे रीव्हस यांच्याबरोबर गोलंदाजी करायचे हेच रे रीव्हस पुढे फुटबॉलचे खेळाडू झाले . वयाच्या १४ व्या वर्षी केन बॅरिंग्टन यांनी शाळा सोडली आणि मोटार मॅकेनिक म्हणून काम करू लागले. ते स्कुटर पासून टॅंक पर्यंत सर्व काही चालवायला शिकले. वर्षभरानंतर ते रिडींग क्रिकेट क्लब मध्ये ग्राउंड्समनचा मदतनीस म्हणून काम करू लागले. ह्या कामामुळे त्यांना अमर्यादपणे क्रिकेटचा सराव करता आला. तिथेच त्यांनी लेग स्पिन कसा टाकायचा ते शिकून घेतले. त्यांना एका लहान सामन्यामध्ये इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि ‘ सरे ‘ चे फलंदाज अँडी संधाम यांनी पाहिले आणि त्यांची योग्य पारख केली आणि त्यांना ‘ सरे कॉल्ट ‘ साठी वयाच्या १६ व्या वर्षी बोलावले तेथे त्यांनी ४३ धावांमध्ये ४ विकेट्स घेतल्या आणि नाबाद ४ धावा केल्या. त्यानंतर ते नेहमी शनिवारी होणाऱ्या सामन्यामध्ये खेळू लागले. तिथे ते अँड्र्यू केम्पटॉन यांच्या संपर्कात आले ते जॅक हॉब्स यांचे मित्र होते. त्यांनी एका सामन्यामध्ये १३ च्या सरासरीने ३० विकेट्स घेतल्या परंतु फलंदाजीसाठी ते शेवटी येत असत त्यामुळे जास्त धावा करू शकले नाहीत. पुढे ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होते आणि त्यांचे नाव होत होते.
त्यांची अँन कोझेन हिची भेट १९५२ मध्ये एक डान्स पार्टीमध्ये झाली. ती तेथील लोकल एज्युकेशन डिपार्टमेंटची सेक्रेटरी होती. त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली परंतु तिच्या वडिलांनी त्यांना सांगितले जर त्यांनी ५०० पौंड सेव्ह केले तर लग्न होईल अशी विचित्र अट घातली. केन बॅरिंग्टन यांनी ती अट मान्य केली तसेच पुरी केलीही आणि त्या दोघांचे ६ मार्च १९५४ रोजी लग्न झाले. हा त्यांचा विवाह त्यांच्या शेवटपर्यंत टिकला.
केन बॅरिंग्टन त्यांचा पहिला कसोटी सामना ९ जून १९५५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्रेन्ट ब्रिज येथे खेळला . त्यापूर्वी बॅरिंग्टन यांनी लँकेशायर विरुद्ध खेळताना नाबाद १३५ धावा केल्या तर १२६ धावा नॉटिगहॅमशायर विरुद्ध केल्या. त्यामुळे त्यांना काऊंटी कॅप मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये ते कॉलिन काऊंड्री च्या बदली खेळत होते कारण काही कारणांमुळे कॉलिन काऊंड्री खेळू शकत नव्हते. परंतु पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही आणि ते शून्यावर बाद झाले तरीपण तो सामना इंग्लंडने एका इनिंगने जिकला . दुसऱ्या कसोटी सामन्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी ३० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या आणि ३४ धावा केल्या. त्या ३४ धावा महत्वाच्या होत्या कारण इंग्लंडचा संघ १३३ धावतच गुंडाळला होता. त्यांना त्या हिरव्या पिचवर खेळताना अवघड जात होते ते सहजतेने खेळू शकत नव्हते कारण पीटर हेईनेची जलद गोलंदाजी . सेकंड इनिंगमध्ये बॅरिंग्टन आणि डेनिस कॉप्टन यांनी ४० धावांची भागीदारी होती त्यामध्ये बॅरिंग्टन यांच्या होत्या फक्त १८ धावा. बॅरिंग्टन यांनी २५६ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९६४ साली काढल्या त्या ७५.८५ या सरासरीने. त्याखालोखाल भारताविरुद्ध १७२ धावा काढल्या होत्या त्या १९६१-६२ च्या सिरीजमध्ये त्यांनी ५९४ धावा ९९.०० च्या सरासरीने काढल्या होत्या त्या ५ कसोटी सामन्यांमधील ९ इनिंगमध्ये . त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध १९६५ मध्ये कसोटी २ सामन्यामध्ये ३०० धावा केल्या त्या १५०.०० च्या सरासरीने. दुसऱ्या महायुद्धानंतर तिसऱ्यांदा त्यांनी सर्वाधिक धावा केल्या. १९६४ साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथ्या कसोटी सामन्यामध्ये २५६ धावा केल्या. त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड, इडेनबर्ग , हेडिंग्ले , लॉर्ड्स , ट्रेंट ब्रिज आणि ओव्हल ह्या पारंपरिक सहा मैदानावर शतके केली.
त्याची कसोटी कारकीर्द संपली ती १९६८ मध्ये . कारण ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्धखेळला तो ३० जुलै १९६८ रोजी .
केन बॅरिंग्टन यांनी ८२ कसोटी सामन्यामध्ये ५८.६७ च्या सरासरीने ६,८०६ धावा केल्या त्यामध्ये त्यांची २० शतके आणि ३५ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २५६ धावा . त्याचप्रमाणे त्यांनी २९ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये ४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. केन बॅरिंग्टन यांनी ५३३ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये ४५.६३ च्या सरासरीने ३१,७१४ धावा केल्या . त्यामध्ये त्यांची ७६ शतके आणि १७१ अर्धशतके होती. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती २५६. त्याचप्रमाणे त्यांनी २७३ विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ४० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या तसेच ५१४ झेलही पकडले. त्यांनी १९८५ ते १९८१ इंग्लंडचे सिलेक्टर आणि टूर मॅनेजर म्हणून काम केले.
केन बॅरिंग्टन यांना १४ मार्च १९८१ रोजी दुसरा हार्ट अटॅकचा तीव्र झटका आला आणि उपचार मिळण्याआधीच त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय ५० वर्षाचे होते.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply