नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मार्टिन क्रो

मार्टिन डेव्हिस क्रो याचा जन्म २२ सप्टेंबर १९६२ रोजी न्यूझीलंड येथील ऑकलंडजवळच्या हेंडरसोन या शहरामध्ये झाला. त्यांचे वडील डेव्ह क्रो फर्स्ट क्लास क्रिकेट कँटरबरी आणि वेलिंग्टनकडून खेळलेले होते. त्याच्या मोठा भाऊ जेफ क्रो कसोटी क्रिकेट खेळलेला होता तर त्याचा पुतण्या रसेल क्रो हा हॉलीवूडचा मोठा अभिनेता आहे. १९६८ मध्ये मार्टिन क्रो त्यांच्या भावाबरोबर आणि वडिलांबरोबर कॉर्नवॉल क्रिकेट क्लबमध्ये जाऊ लागले. ते शाळेच्या क्रिकेट टीमचे कप्तान होते आणि ते रग्बीपण खेळले.

मार्टिन क्रो त्यांचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना १९८० साली ऑकलंडकडून कँटरबरीविरुद्ध खेळले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यावेळी त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ५१ धावा केल्या त्यावेळी त्यांच्या टीममध्ये तो सर्वाधिक स्क्रोर होता. त्यानंतर मार्टिन क्रो यांना सहा महिने लॉर्ड्सच्या मैदानाच्या स्टाफ बरोबर रहाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांना मेलबॉर्न क्रिकेट क्लबतर्फे खेळण्याची संधीही मिळाली. न्यूझीलंडला परत आल्यावर १९८-८२ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटच्या कँटरबरीच्या सामन्यांमध्ये १५० धावा केल्या. त्यावेळी त्यांनी ३२ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ( १९८३ ते १९९० ) ६८.७२ च्या सरासरीने १३ शतके केली. जानेवारी १९९० मध्ये त्यांनी ओटॅगो विरुद्ध २४२ धावा केल्या.

मार्टिन क्रो त्यांचा पहिला कसोटी सामना २६ फेब्रुवारी १९८२ रोजी परंतु त्याआधी १३ फेब्रुवारी १९८२ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. जानेवारी १९८४ मध्ये मार्टिन क्रो यांनी त्यांचे पहिले कसोटीमधील शतक केले त्यावेळी त्यांनी १०० धावा केल्या. मार्टिन क्रो यांनी एप्रिल १९८५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १८८ धावा केल्या तर त्याचवर्षी नोव्हेबर १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८८ धावा केल्या. मार्टिन क्रो १९९० मध्ये पाकिस्तानचा दौऱ्यात न्यूझीलंडचे कप्तान झाले. १९९१ मध्ये श्रीलंकेच्या दौरा असताना त्यांनी २९९ धावा केल्या त्या ५२३ चेंडूत २९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने, ते १० तास मैदानावर खेळत होते.

११९३ मध्ये ऑस्ट्रेलिया टूरवर असताना त्यांना अनेक वेळा जखमी होऊन झगडावे लागले होते म्हणून त्यांच्या ऐवजी केन रुदरफोर्डला घेतले. मार्टिन क्रो हे न्यूझीलंडचे कप्तान असताना त्यांनी १६ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ते कप्तान म्हणून जास्त यशस्वी झाले त्यांनी ४४ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले.

ते सतत नवनवीन प्रयोग करत असत. त्यांचे प्रसारमाध्यमांबरोबर नेहमी खटके उडत असत. कारण प्रसारमाध्यमांनी त्यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. मला स्वतःला मार्टिन क्रो यांना वानखेडे स्टेडिअमला भेटता आले, मला आठवतंय आम्ही बोलत बोलत रस्त्यावर आलो होती आणि त्यांना मी आणि माझ्या मित्रांनी हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी करून दिली होती त्यावेळी त्यांच्याबरोबर ख्रिस केन्सही होता. अत्यंत मनमोकळेपणाने ते बोलत होते.

मार्टिन क्रो शेवटचा कसोटी सामना १२ नोव्हेंबर १९९५ रोजी भारताविरुद्ध खेळले त्याचवर्षी त्याच महिन्यात ते शेवटचा एकदिवसीय सामना खेळले.

परंतु १९ मे २०११ रोजी ट्विटरवरून सांगितले की मी परत क्रिकेट खेळणार कारण त्यांना त्यांचा फिटनेस वाढवायचा होता. म्हणून ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त करत होते. कारण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २५० सामने होण्यासाठी ३ सामने बाकी होते तर २०, ००० धावा होण्यासाठी ३९२ धावा कमी पडत होत्या.

मार्टिन क्रो यांनी ७७ कसोटी सामन्यांमध्ये ५,४४४ धावा केल्या त्यामध्ये १७ शतके आणि १८ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २९९. तर त्यांनी १४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४, ७०४ धावा केल्या त्यामध्ये ४ शतके आणि ३४ अर्धशतके होती. त्यांची तेव्हा सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १०७ धावा. मार्टिन क्रो यांनी २४७ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये १९,६०८ धावा केल्या त्या ५६.०२ या सरासरीने त्यामध्ये त्यांची ७१ शतके आणि ८० अर्धशतके होती. त्या सामन्यांमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २९९ धावा आणि त्यांनी ११९ विकेटसही घेतल्या होत्या. त्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आले.

मार्टिन क्रो यांनी स्थानिक क्रिकेट सुधारण्यासाठी प्रयत्न तर केलेच आणि त्यांनी चॅनेलसाठी समालोचनाचे आणि क्रिकेट एक्सपर्टचे देखील काम केले. आय. पी. एल. मधील काही संघाच्या संघटनेचे त्यांनी सी. ई. ओ. पद भूषवले.

त्यांनी १५ ऑक्टोबर २११२ रोजी परत ट्विटरवरून सागितले की ते आता कँन्सरपासून मुक्त झाले आहेत.

परंतु २०१४ मध्ये परत कँन्सरने डोके वर काढले त्यांना २०१५ चा क्रिकेट वर्ल्ड कप पहाण्याची इच्छा होती. पुढे पुढे त्यांची प्रकृती बिघडतच राहिली आणि ३ मार्च २०१६ रोजी त्यांचे ऑकलंड येथे निधन झाले.

— सतीश चाफेकर. 

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..