प्रख्यात गीतकार, आघाडीच्या बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांचा जन्म २३ जूनला झाला.
संगीता राजीव बर्वे या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील. माहेरच्या संगीता प्रभाकर गोंगे. डॉ.संगीता बर्वे या आयुर्वेद डॉक्टर आहेत. तसेच त्यांनी Masters in Ayurvedic dietetics केले आहे. व मराठी विषयात एम ए ही केलेले आहे. संगीता बर्वे या प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्या स्नुषा म्हणून ओळख असताना मराठी कवयित्री आणि बाललेखिका म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक असल्याने चौथ्या वर्गात असल्यापासून कागदावर शब्द उमटविण्याचा त्यांना छंद निर्माण झाला. माहेरी असताना घरी त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि सासरी प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्यासारखी सासू लाभली. त्यामुळे त्यांचा साहित्य-संगीत या क्षेत्रांचा प्रवास सुरेल झाला. आदितीची साहसी सफर (अनुवादित गद्य), उजेडाचा गाव, खारूताई आणि सावलीबाई, गंमत झाली भारी, झाड आजोबा, रानफुले हे त्यांचे बालकवितासंग्रह. पियूची वही (रोजनिशी- बालनाटय़), संभाजीराजा, हुर्रेहुप (बालसाहित्य) अशी त्यांची साहित्यसंपदा मुलांना आजही आवडते.
त्या केवळ बालकविताच करीत नसून त्यांनी रचलेल्या अनेक बालगीतांवर अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण झाले आहे. नाच रे मोरा, गंमत झाली भारी, या रे सारे गाऊया या नावांचे त्यांचे बालगीत काव्याचे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. अनेक शिबिरांमध्ये त्यांचा सहभाग असतो. कवितासंग्रह, डीव्हीडीच्या माध्यमातून त्यांच्या साहित्याची ओळख सर्वदूर पसरली. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या बर्वे यांना साहित्यदीप प्रतिष्ठान, राज्य शासनाचा तांबे, विशाखा, कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ह. पाटील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कवी आणि गीतकार असा प्रवास असलेल्या बर्वे यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था पुढील पाच वर्षांत वैशिष्टय़पूर्ण काम करेल, अशी अपेक्षा साहित्य रसिकांना आहे. संगीता बर्वे यांच्या संगीतबद्ध कवितांच्या ’बच्चोंकी फुलवारी’ (हिंदी), ‘गंमत झाली भारी’ आणि ’सारे सारे गाऊ’ या तीन डीव्हीडी फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.
वैद्यकीय पदवीधर झाल्यानंतर संगीताबाईंनी वाचनाच्या आवडीपायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्मयापासून ते, निरनिराळ्या साहित्यकृतींचा अभ्यास करता आला; त्या परीक्षेच्या अभ्यासानिमित्ताने त्यांनी संत साहित्यही वाचले.
संगीता बर्वे यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. त्यांनी मुलांसाठी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही. संगीताबाईंचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे.
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
त्यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार, इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या साहित्यभूषण, कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply