बरखा दत्त यांचा जन्म १८ डिसेंबर १९७१ रोजी झाला.
आजही टीवीवर हिरोईन जर्नालिस्ट दाखवायची असेल तर ती बरखा दत्त यांच्यासारखा बॉयकट केलेलीच असते.
पाकिस्तानविरुद्ध १९९९ मधे झालेल्या कारगिल युद्धाच्या उत्कृष्ट कवरेजने बरखा दत्त यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.
एनडीटीवी या इंग्रजी न्यूज चॅनलवरचे ‘वूई दी पीपल’ आणि ‘द बक स्टॉप्स हिअर’ हे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. ‘वूई दी पीपल’ हा त्यांचा शो तर २०१७ मधे त्यांनी एनडीटीवी सोडेपर्यंत तब्बल १६ वर्ष चालला. या शोसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जवळपास २१ वर्ष एनडीटीवीत काम केलेल्या बरखा यांना आई प्रभा दत्त यांच्याकडून पत्रकारितेचा वारसा मिळाला. प्रभा दत्त यांची भारतातल्या सुरवातीच्या महिला पत्रकार म्हणून ख्याती आहे.
वेगवेगळ्या निवडणुकांसोबतच गुजरात दंगल, २६/११ चा मुंबई हल्ला यासारख्या महत्त्वाच्या घटनांचा रिपोर्टिंग करणाऱ्या बरखा दत्त यांचा टू जी प्रकरणातल्या राडिया टेपमधे नाव आलं. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. आता सध्या त्या मोजो, द प्रिंट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply