नवीन लेखन...

रेणूके जगदंबे आई

रेणूके जगदंबे आई    दर्शन दे मजला

तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।

 

तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक

न होई चित्त एक

तूच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।।

रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

 

जमदग्नीची कांता    परशूरामाची तू माता

मनी तूजला भजता

आशशिर्वाद तू देई     आनंदाने सर्वाला  ।।२।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

 

गेले माझे जीवन    तूझे नाम घेऊन

कंठ आले दाटून

चुका आमच्या होई     क्षमा कर अज्ञानाला   ।।३।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

 

सारे अर्पिले प्रेमांत    आळविले भक्तित,

परि न कळली रित

अत:करण गाणे गाई    आवाज नसे ओठाला    ।।४।।

रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

 

नको मजला धन    विटले आतां मन

सोडव मोहमायेतून

चरणांवरी लोळण घेई   हात पसरुं कुणाला   ।।५।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०    bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..