नवीन लेखन...

प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर

सदाशिव अमरापुरकर उर्फ गणेशकुमार नरवाडे यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर जिल्हात अमरापुर यथे झाला. शेवगाव तालुक्यातील अमरापुर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील शेती करत. वडलांना ते शेतीच्या आणि घराच्या सर्व कामात मदत करत. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगरमधील डॉक्टर गोपाळ गणेश रानडे यांनी सुरु केलेल्या शाळेत झाले. शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती तशी नाटकांचीपण आवड होती. ते उत्तम लेग स्पिनर होते , उत्तम फलंदाजही होते. कॉलजमध्ये गेल्यावर त्यांना वाटले कॉलजमध्येपण क्रिकेट खेळता येईल. परंतु त्यावेळी त्यांना नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना बक्षीस मिळाले. त्याच्या मते त्यांच्या आयुष्यात हाच एक टर्नीग पॉईंट ठरला की ते क्रिकेटकडून अभिनयाकडे वळले. डिग्री मिळण्याच्या आधीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सुमारे १५० एकांकिकांमधून काम केले ५० च्या वर नाटके केली. ते नाटक दिग्दर्शित करायचे , कधीकधी अभिनय करायचे. त्यांचे कॉलजमधील प्रोफेसर होते जे नाटककार , कलाकारही होते त्यांचे नाव होते प्रा. मधुकर तोरडमल . अहमदनगरच्या कॉलेजमधून डिग्री घेतली आणि नंतर पुणे विद्यापीठातून हिस्टरी आणि सोशियालॉजि घेऊन त्यानी एम.ए. केले. ते सतत नाटक आणि रिहर्सल यातच गुंतलेले असत. तेव्हा अमरापूरकर यांना जाणवले की नाटकाशिवाय आपण जगू शकणार नाही आणि त्यांनी त्याच्या वडलांना स्पष्टच सांगितले की नाटकांशिवाय मी जगूच शकणार नाही . पॆसे कमावण्यासाठी नाटक असते हे त्यांना त्यावेळी माहीत नव्हते. परंतु महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना जेव्हा बक्षिस मिळाले तेव्हा त्यांना नाटकात काम करण्यासाठी ऑफर्स आल्या आणि त्यात काम केल्यावर ‘ नाईट ‘ मिळते हे त्यांना पहिल्यांदा कळले. पुढे तीच त्यांची रोजी-रोटी होती. इतके ते नाटकात गुंतलेले होते , नाटक हा त्याचा श्वासच होता. त्याचप्रमाणे त्याचे वाचन खूप होते ते नेहमी म्हणत वाचनामुळे आपल्यात आमूलाग्र बदल होतो.

त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे होते परंतु नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशिव अमरापुरकर हे नाव घेतले.

सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापुरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ‘ लग्नाची बेडी ‘ या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. अशा अनेक प्रयोगातून त्यांनी सुमारे एक करोड रुपयांचा निधी जमवला त्यातून त्यांनी समाजातील अनेक पीडितांना दरमहा मदत करण्याचा उपक्रम सुरु केला. त्या नाटकात सदाशिव अमरापुरकर भूमिका करत असत.

मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे अनेक सामाजिक संस्थांशी संबंध होते. त्यांना ते मदतही करत . ते म्हणत मला माझ्याबद्दल कोणी बोलायला सांगितले की मी स्वतःला ऑकवर्ड समजतो, मला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही कारण मी छोटा कलाकार आहे , मी कोणी मोठा नाही. त्यांना स्केचेस , चित्रे काढण्याची आवड होती , शेतीची आवड होती. त्याचप्रमाणे समाजात जे अयोग्य चालले आहे त्याचा ते कडाडून विरोध करत. २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्यावर हल्लाही झाला होता.

अमरापुरकरांनी श्याम बेनेगल यांच्या ‘ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ‘ या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती. त्यांनी पहिला चित्रपट केला तो गोविंद निहलानी यांचा ‘ अर्धसत्य ‘ . खरे तर त्यांनी कधी चित्रपटात काम करण्याचा विचारही केला नव्हता. ते नाट्कातच रमले होते. ते ‘ कन्यादान ‘ या नाटक दिग्दर्शित करत होते त्यावेळी विजय तेंडुलकर त्यांना म्हणाले मी एक हिंदी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत आहे. त्याचे नाव अर्धसत्य आहे त्यात एक छोटी भूमिका आहे आणि मी तुझे नाव त्या छोट्याशा भूमिकेसाठी गोविंद निहलानीना सुचवले आहे , करशील का रोल , तेव्हा अमरापुरकर म्हणाले आता तुम्ही म्हणता आहेत म्हणून करेन , आणि त्या चित्रपटातील त्यांचा तो रोल खूप गाजला आणि त्यानांतर त्यांना खूप चित्रपट मिळाले. त्यांनी विजय तेंडुलकरांना एकदा विचारले होते की तुम्ही तो रोल मलाच देण्याचे कसे काय ठरवले. तेव्हा तेंडुलकर त्यांना म्हणाले ‘ तुझे डोळे ऑपरचुनिस्ट आहेत ‘ तेव्हा अमरापुरकर म्हणाले मला माझे डोळे असे आहेत ते पहिल्यादा समजले. खरा मी ऑपरचुनिस्ट नाही परंतु मी लकी मात्र आहे . कारण अर्धसत्य मधील अडीच-तीन सीन मध्येच त्यांनी केलेला ‘ रामा शेट्टी ‘ इतका प्रभावी ठरला की त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली. त्यांना कधी पोर्ट-फोलीओ पाठव किंवा कलाकारांना कामासाठी जो स्ट्रगल करावा लागतो तो करावा लागला नाही कारण त्यांचे पहिलेच काम इतके जबरदस्त झाले, म्ह्णून ते स्वतःला लकी समजत.

सदाशिव अमरापुरकर यांनी अनेक नाटकातून भूमिका केल्या त्यातील काही नाटकांची नावे अशी आहेत ही स्वप्नं विकायचीत ,छिन्न , ज्याचा त्याचा विठोबा , यात्रिक , लग्नाची बेडी , हॅन्ड्स अप , हवा अंधारा कवडसा . त्याचप्रमाणे ‘ कन्यादान ‘ आणि ‘ किमयागार ‘ या नाटकात काम केले. किमयागार हे वीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. पुढे काही वर्षांनी संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी परत ते रंगभूमीवर आणले. किमयागार या नाटकाच्या आठवणी सांगताना अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी सांगितले , ‘ हे नाटक कुसुमाग्रज यांनी लिहावयास घेतले खरे पण त्यांच्या आजारपणामुळे पूर्ण झाले नाही , पुढे ते सदाशिव अमरापुरकर यांनी पुरे केले. खरे तर कुसुमाग्रजांकडे अमरापूरकरांनी लिहिण्याबद्दल आग्रह केला होता. त्यानंतर वीस वर्षाने ‘ पुढे ते नाटक संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी दिग्दर्शित केले. सदाशिव अमरापुरकर त्या नाटकाला येणार होते , पण ते प्रकृती अस्वथामुळे येऊ शकले नाही , त्यांनी तीन वेळा येण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळा त्याचा आजार मध्ये आला. त्यांना ते नाटक शेवटपर्यंत पहाता आले नाही .अशी खंत संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केली. आजारपणातही त्यांनी अनेकवेळा फोन वरून नाटकाबद्दल चौकशीही केली. काही अडचण आली तर सांगावी असे ते दरवेळी सांगत आणि फोन करून विचारत नाटक कसे चालले आहे .

सदाशिव अमरापूरकर यांनी सुरवातीला खलनायकी भूमिका हिंदी चित्रपटातून केल्या परंतु पुढे त्याच ताकदीने विनोदी भूमिकाही केल्या ज्या कुणीही विसरू शकत नाही. त्यानी अनेक चित्रपटातून भूमिका केल्या, त्याची यादी खूप मोठी आहे, त्यानी अर्धसत्य , आखरी रस्ता , आई पाहिजे ,आखरी रास्ता , आँखे ,आन्टी नंबर १, इश्क , एलान-ए-जंग , कुली नंबर १ , गुप्त , छोटे सरकार , जन्मठेप , झेडपी , नाकाबंदी , पैंजण , बाॅम्बे टाॅकीज , २२ जून १८९७ , वास्तुपुरुष , सडक , हुकुमत , होऊ दे जरासा उशीर अशा अनेक चित्रपटातून भूमेका केल्या. त्यांना ‘ सडक ‘ ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळाले.

अशा जबरदस्त कलाकाराचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईत निधन झाले.

– सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

1 Comment on प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर

  1. Thanks Satish,

    These are the memoirs of a great progressive Artist with multiple Skill sets, Sadashiv Amarapurkar.
    Nicely written Article in his memory.
    Feel like providing detailed appreciation of the Article.

    At the moment I suggest you to write a Book on Sadashiv Amrapurkar, unforgetable character and a great Human.

    I have met him couple of times. After reading the article tears ran down from my eyes.

    If you can do it , I will provide my support for English Translation.
    Best wishes to you.

    Anil Pundlik Gokhale

    Andheri, mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..