तुझ्यासाठी दाही दिशा
जाशी तू कुठेही
माझ्यासाठी फक्त तूच आशा
तू ने सवे कसेही
आहेचं कुठे मज आकांक्षा
स्वप्नात रमते तुझ्याही
विणते नव्याने कोषा
तू दे आकार कसेही
प्रांतप्रांतातील मुक्त देशा
आवडे शोधण्या मलाही
या मजपुढे काही रेषा
आखून जा जरी पुढेही
ही अव्यक्त मौन भाषा
न ऐकू ये कुणाही
तरी ओतते तप्त शिशा
नित्य लाही लाही
काळेभोर मुक्त केशा
सोडून पाहिलेही
बांधून त्यास दशदिशा
तप्त वाट चालतेही
या समांतर चाली रेषा
न छेदे कुठे कधीही
न लोभ न थारा द्वेषा
जगणे स्वीकारते असेही!!
— वर्षा कदम.
Leave a Reply