नवीन लेखन...

क्रांतीकारक आणि संवेदनशील अभिनेत्री – शांता आपटे

”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते गायिका आणि बहुगुणी नायिका ”शांता आपटे” यांचं, ”कुंकू” मधील निरा या त्यांच्या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्री आणि अन्यायाविरुध्द बंड पुकारुन समाजाला सत्मार्गाकडे नेणार्‍या स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली; त्याकाळी अश्या भूमिका साकारुन अजरामर करणं हे मोठं धारिष्ठ्यच होतं आणि शांता आपटेंनी हे लिलया पेललं; १९३१ ते १९५३ या काळात शांताजींनी रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीतरंगभूमीवर साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहिल्या; कलाक्षेत्रात यशाच्या शिखरा असताना व्यक्तिगत आयुष्यातपण शांता आपटेंची प्रतिमा ही ‘अन्यायाविरुध्द लढून पुढे जाण्याची’, ‘प्रचंड महत्वाकांक्षी’ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ‘प्रेमळ स्वभाव’ सांता आपटेंच्या कलाकारकीर्दीला आणि व्यक्तित्वाला उजाळा दिला. शांता आपटेंची कन्या आणि सुप्रसिध्द अभिनेत्री ”पद्मश्री. नयना आपटे” यांनी खास ‘मराठीसृष्टी.कॉम’ वरील ”महाराष्ट्राच्या दिपशिखा” या सदरासाठी…”

भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होता. अश्या या गुणी अभिनेत्री चा जन्म १९ मार्च १९२३ सालचा, त्यांचे वडिल रामचंद्र आपटे रेल्वेत नोकरीला होते; शांता आपटेंच शालेय शिक्षण ४थी पर्यंतचं, त्यानंतर घरीच शिकवण्यासाठी शिक्षक येत, अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनाचे धडे सुध्दा शांता आपटेंना दिले गेले; पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे संगीताचं पहिलं प्रशिक्षण घेतलं; कालांतर त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचं प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णाराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांता आपटेंनी गायनाचे छोटे-मोठे जलसेही करु लागल्या; अश्या या गोड गळ्याच्या गायिकेला रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत;हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग , स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या ! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला. शांता आपटेंची ओळख बनला; कारण त्यांची कुंकूतील भूमिका त्या काळातल्या एका अतृप्त मनाचा ठाव घेणारी होती जी शांता आपटेंनी हिबेहूब रंगवली.
”कुंकू” आणि ”स्वयंसिध्दा” या चित्रपटात अन्यायाविरोधात पेटून उठणार्‍या स्त्रीचं दर्शन शांता आपटेंनी घडवून दिलं. शांता आपटेंचा खाजगी जीवनात वावरसुध्दा अन्याय सहन करायचा नाही आणि वेळ प्रसंगी त्यांनी ते दाखवून देखील दिले. एकदा एका पत्रकाराने शांता आपटेंविषयी काहीतरी खोटी खरपूस बातमी बनवली, ती बातमी वाचल्यावर त्या खूपच हैराण झाल्या ! आपण ही गोष्ट बोललोच नव्हतो तर त्या पत्रकाराने छापलीच कोणत्या आधारावर? त्याक्षणी अगदी बेधडकपणे शांता आपटे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेल्या व ही बातमी छापणार्‍या पत्रकाराला आपल्या फटक्यांचा प्रसाद द्यायला देखील मागे-पुढे पाहिले नाही. हा प्रसंग म्हणजे एक अपवाद असला तरी खोटेपणाच्या विरोधात केलेला हा मुकाबलाच होता; मिलेट्री माईंडेड असल्याने वेळेचे भान, हजरजबाबीपणा , शिस्तबध्दता , आणि हाती घेतलेलं कार्य वेळच्यावेळी पूर्ण करणे हे गुण अगदी नमुद करण्यासारखेच होते. तसंच एक आई म्हणून शांता आपटे स्वत: आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. शांता आपटेंना हिंदी, मराठी, इंग्रजी सोबतच अनेक भाषा अवगत होत्या; त्यामुळे अनेक प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका करता आल्या ज्यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे.
त्याकाळी महिलांचा रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील वावर कमी होता,पण या क्षेत्रात महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करावी असं त्यांना मनोमन वाटे, आणि म्हणून ऑफस्क्रीन आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ना शांता आपटेंकडून सतत प्रोत्साहून मिळत असे.
१९५३ नंतर शांता आपटेंनी मराठी संगीत रंगभूमीवर ”सौभद्र” , ”मानापमान” , ”लग्नाची बेडी” , ”एकच प्याला” सारख्या नाटकांमधून दर्जेदार भूमिका केल्या, अनेकअंकी असलेल्या या नाटकांसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे मोठे आवाहन असे; म्हणून प्रयोगात सतत नाविन्यपूर्ण भूमिका सादर करण्याची जबाबदारी कलाकारांवर असायची, याच भान शांता आपटेंना असल्याने नेहमीच आपल्या अभिनयाचे वैविध्यमय आविष्कार सादर केले तसंच अनेक जुन्या ‘संगीत’ नाटकांना, पुनर्जीवीत केले, ते म्हणजे त्याकाळातील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन अर्थात या नाटकांचा पारंपारिक बाज आणि मुळ गाभा मात्र तसाच ठेवला गेला.
एका प्रसंगाचा किस्सा नयना आपटे सांगतात की मुंबईतल्या गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर या रस्त्याचे उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते करायचे होते. अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले.
शांता आपटेंना जीवन फार काळ लाभले नाही, वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. पण आयुष्याच्या अखेरच्या पढावात त्या नयना आपटेंना एक वाक्य म्हणाल्या होत्या की “मला माहित आहे मी फार काळ नाही जगणार, पण माझी एकच इच्छा आहे की कलेचा वारसा तू पुढे चालवावा आणि तो इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी सुध्दा सतत प्रयत्नशील रहा “; नयना आपटेंनी शांता आपटेंचे शब्द मनात अगदी लख्खपणे कोरले आणि त्यांचा रुपाने एक कुशल नृत्यांगना व हिंदी मालिका, नाटकं, चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडले.
शांता आपटेंनी चित्रपट सृष्टीतील आपले अनिभव लक्षात घेऊन ‘जाऊ मी सिनेमात’? हे पुस्तक लिहिले; हे केवळ पुस्तक किंवा आत्मचरित्र नसून, तरुण मंडळींसाठी उपदेश आणि मार्गदर्शनापर लेकन आहे; सिनेक्षेत्रात आत्मचरित्र लिहिणार्‍या शांता आपटे या पहिल्या स्त्री अभिनेत्री; अशा प्रतिभाशाली, सर्वांगसुंदर, जिद्दी, प्रबळइच्छा शक्ती बाळगणार्‍या, दूरदृष्टीचा विचार करणार्‍या शांता आपटेंचं व्यक्तिमत्व भारताच्या इतिहासातील कायम अजरामर होऊन नवोदितांना प्रेरणा देणारं ठरेल, आणि महाराष्ट्राची एक बुलंद दिपशिखा म्हणून स्वाभीमान निर्माण करेल.

संपादक – निनाद प्रधान

तांत्रिक सहाय्य – सुमित्र माडगूळकर

संकल्पना, निमिर्ती व संकलन – सागर मालाडकर

निर्मिती सहाय्य – पुजा प्रधान

छायाचित्र संकलन – पुजा प्रधान, आदित्य देशपांडे आणि सागर मालाडकर

(शांता आपटेंची संबंधित छायाचित्रे अभिनेत्री नयना आपटेंकडून मराठीसृष्टी.कॉमला “एक्सक्लुझिव्हली” उपलब्ध करुन दिल्यामुळे या छायाचित्रांवर मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळाचा अधिकार आहे )

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..