१९७८ च्या ‘सुपरमॅन’चे दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर रिचर्ड डोनर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी न्यूयॉर्क येथे झाला.
रिचर्ड डोनर यांचा जन्म न्यूयॉर्कमधील एका यहुदी कुटुंबात झाला होता. आपल्या करीयरच्या सुरुवातीला त्यांना एक अभिनेता व्हायचं होतं. मात्र नंतर त्यांनी दिग्दर्शनाचा मार्ग निवडला होता.पण १९५० साली त्यांना डेसिलुची जाहीरात करण्याची संधी मिळाली. टीव्ही क्षेत्रात सुद्धा १२५ क्लासिक शोसाठी त्यांनी दिग्दर्शन केलं. यात हॅव गन-विल ट्रॅव्हल, द फ्यूगिटीव्ह, गेट स्मार्ट, म मॅन फ्रॉम अंकल, द वाईल्ड वेस्ट, द ट्विलाईट झोन अशा अनेक मालिका खूप प्रसिद्ध झाल्या.
डोनर यांनी ‘एक्स 15’ च्या माध्यमातून फिचर फिल्मच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली १९७६ साली रिलीज झालेल्या ‘द ओमेन’मधून.
त्यानंतर १९७८ साली रिलीज झालेल्या ‘सुपरमॅन’ चित्रपटाला दिग्दर्शित करण्यासाठी त्यांनी १ मिलियन डॉलर इतकी रक्कम घेतली होती. रिचर्ड डोनर हे चित्रपट बनवताना त्यातील पात्रांमध्ये आपला जीव ओतून देत असत. सुपरहिरो उडू शकतो हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स देण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या चित्रपटातील सुपरमॅनच्या भूमिकेसाठी त्यांनी क्रिस्टोफर रीव यांची निवड केली होती. ते आजही प्रेक्षकांच्या मनात सुपरमॅन बनून राहिले आहेत. त्यांची ही शैली आजच्या २१ व्या शतकाच्या काळात अनेक दिग्दर्शक वापरताना दिसून येतात.
रिचर्ड डोनर यांचे ५ जुलै २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply