नवीन लेखन...

रोगप्रतिकारक क्षमता

प्राणवायू आणि वृक्ष

माणसाची रोगप्रतिकारक्षमता ही त्याला मिळणारा आहार, प्राणवायू, त्याची झोप आणि व्यायाम यावर अवलंबून असते. पैकी प्राणवायूचा पुरवठा शरीराला जितका अधिक प्रमाणात होईल, तितक्या शरीरातल्या सर्व पेशी ताज्यातवान्या व सुदृढ राहतील. या संदर्भात “नैनिताल” चे उदाहरण उत्तम आहे. काही वर्षांपूर्वी नैनितालमध्ये छोटे दवाखाने, औषधी दुकाने फारशी उपलब्ध नव्हती. म्हणजे अगदी एखाद् दुसरं उपलब्ध होतं. (सद्यपरिस्थिती माहीत नाही.) एक मोठे हॉस्पिटल होते ते ही शहरापासून ४० कि.मी. अंतरावर. त्याची गरज केवळ अपघातापुरतीच होती. कारण तिथल्याच एका वाहनचालकाच्या शब्दात सांगायचं तर, “यहॉं की अबो-हवा ही कुछ ऐसी है, की कोई बिमारही नही होता”। शुद्ध प्राणवायूमुळे आजारांचे प्रमाण नगण्य होते. कारण प्रत्येक पेशी शरीरात घुसणार्‍या शत्रूचा नाश करायला सज्ज आणि सक्षम असते.

शहरातल्या माणसांना मात्र कुठलाही नवीन आजार आला की त्याची “लस” आधी हवी असते. कारण स्वत:च्या रोगप्रतिकारशक्तीवर त्यांचा विश्वास नाही. कसा असणार? बेसुमार वृक्षतोड, सिमेंटची जंगलं, वाहनांच प्रदूषण, कारखान्यांच प्रदूषण, भरमसाट लोकसंख्येच्या श्वासातून होणारं प्रदूषण – अशा आपणच आपल्या समस्या वाढवल्या आहेत.

शहरातली माणसे तर आयुष्यभर अनेक वृक्ष, झाडे, वेली यांचा स्वत:साठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर करुन घेतात. पण पुढच्या पिढीसाठी आयुष्यात एकही वृक्ष लावून त्याचे संगोपन करीत नाहीत. त्यामुळे “वृक्ष लावू – वृक्ष वाढवू” अशी तळमळ किंवा ध्यास प्रत्येकाने घेतल्याशिवाय शुद्ध हवेचे वरदान लाभणार नाही. आणि जोपर्यंत शुद्ध हवा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत श्वसनमार्ग सुदृढ कसा होईल? तेव्हा “झाडे वाढवू आणि सुदृढ होऊ.”

रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी

खरंतर रोगप्रतिकारक्षमता ही एका गोळीनं, एका इंजेक्शननं किंवा एका दिवसात वाढणारी, विकसित होणारी गोष्ट नाही. मनुष्याच्या जीवनातील ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या.

१. सकाळी लवकर उठावे. यावेळी शरीरात नॅचरल स्टेरॉइड निर्माण होतात. जे रोगप्रतिकारक्षमता वाढवतात.२. सकाळीच घाम येईपर्यंत व्यायाम करावा. व्यायामामुळे ही नैसर्गिक स्टेरॉइड शरीरात सर्वत्र रक्तामार्फत पुरवली जातात.३. व्यायामानंतर उटणे किंवा शिकेकाई लावून स्नान करावे.४. भूक लागली की, ताजे, सकस, षड्रसयुक्त अन्न घ्यावे. आहार पोषक असावा. तसेच तो पारंपारिक असावा. नवीन अन्य देशांतले पदार्थ शक्यतो टाळावे.५. वेळेवर (रात्री) पुरेशी झोप घ्यावी.६. व्हिटॅमिन-सी साठी आवळा, व्हिटॅमिन-ए साठी तूप, व्हिटॅमिन-बी साठी दूध हे श्रेष्ठ नैसर्गिक घटक आहेत.७. झोप, जेवण, पाणी, मांसाहार, कृत्रिम व्हिटॅमिन्स या सगळ्यांचाच अतिरेक टाळावा.८. प्रत्येक ऋतूमध्ये आयुर्वेदाच्या पद्धतीनुसार योग्य ते शोधन कर्म करून घेण्यानेही रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.९. ऋतूंप्रमाणे आहारात बदल करावा.१०. कोणताही आजार वेळेवर बरा करुन घ्यावा.११. रोगप्रतिकारक्षमता कमी करणारी औषधे दीर्घकाळ घेऊ नयेत.

आदर्श परिचर्या –

१. खदिर, करंज, अर्जुन या चूर्णाने दात घासावे. दात घासण्याच्या पावडरमध्ये तुरट, तिखट, कडू रसाने दात घासावे.

२. डोळ्यांत मधाचे अंजन घालावे.३. दररोज अणुतेलाचे दोन थेंब नाकात घालावे.४. दररोज अंगाला तीळतेलाने स्नेहन करावे व कोवळ्या उन्हात ५ ते ७ मिनिटे बसावे. विशेष करून डोळ्याला, पायाला तिळाचे स्नेहन करावे.५. शक्तीनुसार व्यायामाचा अभ्यास करवा यात चालणे, सूर्यनमस्कार, योगासने यांचा समावेश असावा. कपाळावर घाम येईपर्यंतच व्यायाम करावा.६. अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका हा प्राणायाम करावा.७. अनंता मंजिष्ठा, चंदन, अगरु इ. द्रव्यांचे उटणे लावून स्नान करावे. यामुळे अंग स्थिर होते व त्वचा निर्मल होते.८. कोमट पाण्याने स्नान करावे. (अति उष्ण, अति शीत नको).९. स्थूल व्यक्तीने दररोज सकाळी भाजक्या तांदळाची पेज मिरपूड घालून घ्यावी, मीठ घालू नये.१०. सकाळचे जेवण ११ ते १२ च्या दरम्यान व रात्रीचे ६ ते ८ या वेळात घ्यावे.११. हलका, सहज पचणारा, सकस आहार घ्यावा. यामध्ये गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भाजक्या तांदळाचा भात, मुगाचे कढण, फळभाज्या घ्याव्यात. अंजीर, मोसंबी, मनुका, डाळींब, डोंगरी आवळा, सफरचंद, आंबा, कोकम खावे.१२. तळलेले वपचायला जड व शिळे अन्न शक्यतो खाऊ नये.१३. उन्हात जाताना टोपी / रुमाल बांधून जावे.१४. रात्री सुखकारक – गुलाबकळी, मनुका, त्रिफळा, तूप आणि मध यांचे अनुलोमन घ्यावे.

— आरोग्याचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..