IT कंपनी … नेहमीचं कॉर्पोरेट वातावरण …
गळ्यात कायम I card , Thumb print Entry , आपला आपला desk , सारखे calls आणि मेलामेली …
“याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची …
department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली …
पण जाम आवडायची …
ती सुद्धा अधून मधून डोकवायची …
थोडा अंदाज तिलाही आला होता …
हा मात्र बुजरा …
कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा ….
दिवसांचे महिने झाले …
या आठवड्यात नक्की बोलायचं !! … ठरलं!! …
पण तिला काय वाटेल ? … गैरसमज झाला तर ?…. परत फुस्ससस sss…
त्यात कोरोनाचं झेंगाट सुरु झालं … काही कळायच्या आत Lockdown…
संपलंच सगळं ….
आधी बोललो असतो तर थोडी ओळख झाली असती … निदान फोनवर तरी बोलता आलं असतं …
नुसता पश्चात्ताप …
त्यात बाहेर कोविडचं टेन्शन आणि दुसरीकडे वर्क फ्रॉम होमचा ताण …
महिने लोटले असेच…
एकदाचं Lockdown संपलं… … निवडक स्टाफ येऊ लागला…
त्यात याचा नंबर लागला आणि “त्याच्या सुदैवाने” तिचाही…
दोघांच्या कॅब वेगवेगळ्या …. पण मागोमागच यायच्या …
आता मास्कच्या आत दडलेला चेहरा … पुन्हा नजरेचा खेळ सुरु …
तिच्या आजूबाजूला घुटमळायचा …. पण सोशल डिस्टन्स ठेवून…
लंचच्या वेळी कॅन्टीनमध्ये थोडा लांब पण नजरेच्या टप्प्यात बसायचा … तिच्या मास्क काढलेल्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत…
ती रागवतही नव्हती पण फार बघत-बोलतही नव्हती …
तिलाही तो आवडू लागला होता … पण ती वाट बघत होती ….
तिच्या अशा वागण्यामुळे हा पार गंडला होता …
Lockdown च्या आधीचं सगळं अवसान गळून पडलं …
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ….
हे “डील” काही केल्या “क्रॅक” होत नव्हतं …
बोलायला याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता आणि त्यामुळे ही कोंडीही …
अशीच एक work load मुळे थकवा आलेली संध्याकाळ ….
Tea time … सगळे कॅन्टीन मध्ये …
ही एक अर्जंट मेल पाठवायला खुर्चीत बसली होती …. पण चहा मात्र मस्ट होता …
तशीच एका हातात मोबाईल घेऊन type करत निघाली ….
नवीन प्रथेप्रमाणे… चहा आधी sanitizer च्या रांगेत उभी…
हा मागे होताच … “दो गज की दुरी” ठेवून ..
तिने मोबाईलच्या नादात जोरात sanitizer stand च्या पॅडल वर दोन-तीनदा पाय मारला … फट-फट-फट
आणि भस्सssकन sanitizer तिच्या हातावर …
हात पार चिंब झाला … sanitizer ओघळू लागला …
हिला काय करावं कळेना …
हातात मोबाईल .. पटकन कुठे ठेवताही येत नव्हता..
थोडी सैरभैर झाली..
हा लगेच मागून धावत आला …
तिला काही कळायच्या आत तिच्या त्या चिंब हातावर याने आपला हात ठेवला..
“वाहत्या सॅनिटायझर मध्ये हात धुवून घेतले”..
तिच्या हातावर आपला हात घासत घासत …
त्या बाटलीवर लिहिलेली सूचना तंतोतंत पाळत होता …
“Rub Hands… until dry”
Distancing चा फज्जा .. त्याची मात्र मज्जा
Full to.. “हात की सफाई”..
पण ही त्याची अगदी प्रतिक्षिप्त क्रिया होती ….
काही ठरवून किंवा संधीसाधुपणा नव्हता …
त्याचा हाच निरागसपणा तिला खूप भावला..
ती अगदी मनमोकळेपणाने हसली.. आणि तोही..
हात चोळून ,घासून कोरडे झाले आणि मनात भावनांचा ओलावा..
तिच्या अर्जंट मेलचे बारा वाजले..
दोघांनी एकत्र चहा घेतला…
हसत खेळत खूप गप्पा मारल्या.. अगदी जुनी ओळख असल्यासारख्या…
अनेक महिन्यांचा अडकलेला प्रोजेक्ट अचानक मार्गाला लागला … एका अनपेक्षित Hand “Rub” मुळे..
दिवा घासून अल्लादिन यायचा आपली मनोकामना पूर्ण करायला …
इथे दिवा नसतानाही नुसता हात Rub करून याची इच्छा पूर्ण झाली…
ध्यानीमनी नसताना..
हा आजचा Hand RUB चा प्रसंग घडला नसता तर कदाचित प्रेम व्यक्त करायच्या आधीच प्रेम भंग झाला असता…
पण प्रेमकहाणीत कधी काय twist येईल संगता येत नाही …
प्रेमाची कळी उमलण्यासाठी Hand RUB चं निमित्त…
…आणि त्या दिवसापासून या “जोडी”चा “प्यार का सिलसिला” सुरू झाला.. ..
“RUB” ने बना दी जोडी ”
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply