नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग ११

संतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला.
“म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!”एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला!
रूद्रा तयारीतच होता. तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला!
०००
फोन बंद करून मनोहर आपल्या बाईक जवळ अंधारातच थांबला. तेथून तो नक्षत्र बंगला, त्याचे मेनगेट आणि परिसर दिसत होता. साधारण तासा दीडतासाने एक व्यक्ती झापाझपा ढांगा टाकत बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरून आली आणि झाडीत अदृश्य झाली.! तो रूद्रा असल्याचे मनोहरने चटकन ओळखले. कोठे तरी मोटरसायकल स्टार्ट झाल्याचा आवाज झाला आणि विरून गेला. रूद्रा निघून गेला होता!

मग मात्र मनोहरने वेळ दवडला नाही.पायातले बूट त्याने बाईक जवळच काढून ठेवले. नुसत्याच पायमोज्यावर, तो जसवंतच्या केबिन जवळ आला. अपेक्षेप्रमाणे जसवंतने लागोपाठ दुसरी पुडीही चढवली होती. नशेतच त्याने मनोहर साठी गेट उघडले आणि पुन्हा काहीतरी बरळत तंगड्या फाकवुन खुर्चीत फतकल मारून बसला.

आऊट हाऊसचे दार आतून बंद होते. मग रूद्रा आत कसा गेला? मनोहरने आऊट हाऊसला वळसा घातला. खिडकी उघडी होती. हाती ग्लोज असल्याची खात्री करून तो खिडकीतून आत गेला. निर्जीव डोळ्याचे संतुकराव त्या टेबल लॅम्पच्या उजेडात भयानक दिसत होते! क्षणभर मनोहरच्या अंगावर काटा आला. त्याने पेंटिंग मागची असेम्ब्ली आणि कॅमेरा हस्तगत केला आणि खिडकीतूनच बाहेर पडला!भोसेकर चाळीच्या खोलीत त्याने पाऊल टाकले तेव्हा सकाळचे तीन वाजले होते! काम मनासारखे झाले होते!
०००
दुसरे दिवशी मनोहरला जाग आली तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते! रात्रीच्या जागरणाने डोळे अजून चुरचुरत होते. त्याने गार पाण्याने अंघोळ उरकली तेव्हा कोठे त्याला फ्रेश वाटले. त्याने काळजी पूर्वक रात्री झालेली स्पाय कॅमेराची शूटिंगची प्रिंट तपासली. चार तासाच्या व्हिडिओत फक्त पंधरा मिनिटाचा मुख्य ड्रामा होता! सर्व प्रथम त्याने ती क्लिप एडिट करायला घेतली. थोडासा ब्राईटनेस आणि कन्ट्रास्ट ऍडजेस्ट केला. तो कॅमेरा कलेक्ट करायला गेला होता त्या भागाचेही चित्रीकरण झाले होते. ते त्याने कट करून डिलीट करून टाकले. झकास! मस्त काम झाले होते.

या क्षणी मनोहर भयानक खुश होता. त्याची आत्तापर्यंतची योजना सुरळीत पार पडली होती. हे इतके सहज घडेल असे त्याला वाटले नव्हते. संतुकरावच्या खुनाचे फक्त दोनच धागे त्याच्या पर्यंत पोहचू शकत होते. जसवंतचा प्रत्यक्ष धागा होता तर रुद्राचा अप्रत्यक्ष घागा ! या दोघांवर मात करणे गरजेचे होते. आणि त्याची स्पष्ट योजना मनोहरच्या डोक्यात तयार होती!

या शूटिंगच्या आधारे राघव रुद्राच्या मुसक्या आनंदाने आवळणार होता. पण त्या पूर्वी काही रक्कम, किमान त्याने सुपारी साठी दिलेले तीन लाख तरी वसूल करण्याचा त्याचा मानस होता! म्हणून मनोहरने त्या शूटिंगची एक छोटीशी क्लिप सिलेक्ट करून आपल्या मोबाईलवर घेतली.  आणि रुद्राचा फोन नम्बर फिरवला.

“रुद्रा बोलतोय!”
“हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?”

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..