नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग ७

रुद्राला सुपारी दिल्या पासून मनोहर त्याच्यावर लक्ष ठेवून होता. रुद्राच्या फ्लॅट समोरच्या टपरीवर चहा, जवळच्या ‘बनारस पान महल’ मध्ये पान -तंबाखू. आणि कोपऱ्यावरच्या वडापावच्या गाड्यावर क्षुधा शांती!

भोसेकराच्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर शेवटची खोलीत मनोहर गेल्या आठ -दहा महिन्या पासून भाड्याने रहात होता. भोसेकराच्या गुंड भावाला त्याने वर्षाच्ये भाडे सुरवातीसच देऊन टाकले होते. दर महिन्याला तो तगादा त्याला दारात नको होता. तो सकाळीच घरा बाहेर पडत असे आणि रात्री उशिरा म्हणजे अकराच्या नन्तर परतत असे. त्यामुळे शेजाऱ्यांना त्याचे अस्तित्व फारसे जाणवत पण नसे. हे शहर अक्राळ विक्राळ पसरलेले, पब्लिक ट्रान्सपोर्ट बेभरोश्याचा, म्हणून धावपळी साठी एक जुनाट मोटरसायकल त्याने विकत घेतली होती. तिचा प्रत्येक पार्ट वेगळ्या कंपनीचा होता! इतकेच काय पण नम्बर प्लेट सुद्धा ओरिजिनल नव्हती!

रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सारी चाळ झोपेच्या आधीन झाली होती. सर्व बिऱ्हाडात अंधार होता. अपवाद फक्त मनोहरची खोली होती. त्यात अजून पिवळा पडलेला चाळीसचा बल्ब जळत होता. त्याच्या खोलीत एक लोखंडी पलंग, त्याच्यावर कापसाच्या गुठुळ्या झालेली गादी. कोपऱ्यातल्या बाथरूम नामक आडोश्याला एक प्लॅस्टिकची बदली आणि मग इतकीच मनोहरची जंगम मालमत्ता . या गोष्टी त्याने येथेच खरेदी केल्या होत्या. गावाकडून येताना त्याने फक्त एक पत्र्याची ट्रंक आणलेली होती. त्यात चार कपडे, टॉवेल आणि बुडाला बारा लाखाच्या नोटा भरून आणल्या होत्या! आजवर त्यातले निम्मे संपले होते! आजोबा मेल्यावर त्यांचे राहते घर अन सोलापूरच्या विजापूर रोडला लागून असलेली सात एकरचा तुकडा फुकून टाकला होता.

खोलीच्या मध्यभागी तो दोन्ही तंगड्या पसरून बसला होता. समोरच्या कागदावरच्या फरसाणचे बकणे तोंडात कोंबत होता. मधेच गावठी दारूची बाटली तोंडाला लावत होता.

“धूत साली हि जिंदगी! भिकार जीण! त्या थेरड्या मुळे हे दरिद्री जगावं लागतंय! पण वांदा नाही. आपुन पन एक दिवस पैश्याच्या ढिगल्यात लोळणार! चांदीच्या –हाड –सोन्याच्या गिलासात विलायती दारू पिणार! बुढ्या तुला नाय सोडणार! अन तुझा पैसा पन! माज्या आईचा आणि माझी जिंदगानी बरबाद केल्याचा बदला घेणार!”

त्या नशेत त्याने कॉट खालची पेटी वडून बाहेर काढली. तीच झाकण खाड्कन उघडलं. नोटा खाली तळाला कागदात ठेवलेले जुने पुराने, पिवळे पडलेले काही फोटो त्यात होते. त्यातला एक फोटो त्याने थरथरत्या हाताने डोळ्यापुढे धरला. त्यात एक विशीतली पोरगी आणि वयाने थोडा मोठा असलेला म्हणजे तिशीकडे झुकलेला माणूस तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा फोट. त्या फोटोतल्या पोरी कडे तो बराच वेळ टक लावून पहात होता. त्याच्या डोळ्यात पाणी साचूलागले, हुंदका अनावर झाला! ती पोरगी मोहिनी होती,मनोहरची आई!

०००

“मोहिनी, मी उद्या मुंबईला जातोय! चार सहा दिवसात परत येईल.” संतुक मोहिनीच्या शेजारी बसत म्हणाला.

“संतू ,तुला मही परिस्थिती ठावंच हाय ! दोन महिन झाल्याती! मह्या पोटातलं बाळ झपाट्याने वाढतंया.  लई काळ नाही झाकून रह्यच !” मोहिनी काळजीच्या सुरात म्हणाली.

“हो ग ,मला ठाऊक आहे. नौकरीचा इंटरव्हिव आहे. जाण भाग आहे. तेथून आलो कि तडक तुझ्या घरी येतो अन तुला मागणीच घालतो! मग त झालं? मला नौकरी लागली कि मजेत दोघ मुबईत राहूत! ”

” संत्या, त्या चिकन्या गप्पा नग हनूस! लवकर ये बाबा! आजवर काई मागतील नाई, पर आज मागते  आपल्या या पेरमाला नात्याचं नाव दे!”

“मोहना, मी हा गेलो अन हा आलो! येताना मंगळसूत्र घेऊन येतो! मग त झालं?”

पण ‘हा’ गेलेला संतुक परातलाच नाही! चार दिवसात येणारा संत्या, महिना झाला तरी आला नाही! संतू आपल्याला ‘टाकून’गेल्याच मोहिनीने डोक्यात घेतले. ती वेडी पिशी झाली. पोटातलं पोर, गावकऱ्यांच्या विचित्र नजरा, आणि प्रश्नांची उत्तर काय देणार?आणि कुणा कुणाला? विश्वासघात, अपमान,असहाय्यता, राग याने तिच्या डोक्यावर परिणाम झाला! तिला खरेच वेड लागले! तिच्या पेक्षा तिच्या बाबाची अवस्था बिकट होती. आईविना मोहिनीला बापाने तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपली होती. तिचे पोट दिसू लागले तसे त्याच्या हातापायातले बळ गेले. तिने संतुकचे नाव सांगितले ! संतुकला त्याच्या चुलत्याने सांभाळे होते. बाप संतुकच्या चुलत्या कडे जाब विचारायला गेला. “तुझी पोरगी भ्रमिष्ट झालिया! कुणाचं बी नाव घेतीय!” चुलत्याने हात वर केले. गावात फक्त ‘मुंबईला गेलाय चार दिवसात परतणार!’ संतुकची  इतकीच माहित मिळत होती.त्यात ‘तो लोकल खाली मेला असेल!’ अशी हूल कोणी तरी उठवली. बाप तिला कसेबसे डॉक्टरकडे घेऊन गेला. पण डॉक्टरनी ‘मोकळी’ करण्यास नकार दिला! कारण ती वेळ टळून गेली होती !

दोन महिने बापाने कशी बशी दोन महिने कळ काढली. एके रात्री घरबार विकून, मोहिनी सकट गाव सोडले! लांब सोलापूरकडे निघून गेला. मोहिनीने एक गोंडस बाळ बापाच्या पदरी टाकलं अन जीव सोडला. जणू त्याच्या जन्मासाठीच ती माउली जगत होती! हि सारी कर्मकहाणी मनोहरला त्याच्या  आजोबानी अनेक वेळा सांगितली होती. त्यानेच मोहिनी आणि संतुकचा जत्रेत काढलेला फोटो दाखवत ‘हा,हाच तुझा बाप! बेईमान,हरामखोर, उलट्या काळजाचा, तुझ्या, माझ्या आणि तुझ्या आईच्या वनवासाला कारणीभूत झालेला नीच माणूस! याचा बदला घ्यायला हवा! अश्या लोकांची जागा नरकातच! मी आता म्हातारा झालोय, हे काम तुलाच करायचंय!’ हे विचार लहानग्या मनोहरच्या कोवळ्या मनावर म्हाताऱ्याने चांगलेच बिंबवले होते!

आजोबा मेल्यावर एक दिवस अचानक ‘संतुकराव सहदेव’ यांचा ठाव ठिकाणा मनोहरला लागला ! कुठल्याश्या पेपरात संतुकरावची अल्पकाळातील उतुंग भरारीची ती कहाणी होती. त्यात त्यांच्या काही फोटोंचा समावेश होता, जुन्या नव्या! मनोहरने ‘ बापाला ‘ तात्काळ ओळखले!

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..