नवीन लेखन...

रमी

पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो.

या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते.

कुणाला कसे पत्ते मिळणार हा नशिबाचा भाग असतो. अर्थात कितीही नशीब बलवत्तर असले तरीही, प्रयत्नवादी नसेल तर हार होणारच. आता पहा, हातात आलेले पत्ते प्रत्येक खेळाडू सर्वात प्रथम योग्य तर्हेने लावतो, त्यानंतर ठरवले जाते, डाव खेळायचा की पॅक करायचे. याला जीवनात शिस्त व नीटनेटकेपणा म्हणतात, हे गुण ज्याच्या अंगी असतील त्याची निर्णय क्षमता परिपक्व होते. अव्यवस्थित लोकांना हेच जमत नाही, आणि कदाचित हातात आलेले चांगले पत्ते न जुळवता आल्याने, जीवनात अपयशाचा सामना वारंवार करावा लागतो.

सर्वात प्रथम , प्युअर सिक्वेन्सला सर्वात जास्त महत्व प्राप्त होते. हा सिक्वेन्स हेच सांगतो, प्युअर नसेल तर, तुमच्याकडे कितीही चांगले गुण असोत, काहीही उपयोग होणार ना………ही. प्युअर म्हणजे काय, तर जे विचारांनी, आचरणांनी, कृतीने….स्वच्छ, निर्मळ, पवित्र नाही, अश्या जीवनाच्या खेळला, काहीही महत्व नाही. फसवी, धोका देणारी, वृत्ती प्युअर नसतेच.

हातात तेरा पत्ते असतात, या तेरात जर सुरवातीलाच प्युअर सिक्वेन्स जमला असेल तरच, तो डाव जिंकण्याची आशा असते, अन्यथा पॅक होणे योग्य असते. कधी कधी बाका प्रसंग ही येतो, प्युअर सिक्वेन्स असूनही, बाकीचे पत्ते, लाभी नसतात, अश्या वेळेसही पॅक होणे हेच चांगले. पॅक होणे, म्हणजे हार मानणे असे नाही, हे खेळाडूला चांगले माहीत असते. जीवनात सुद्धा सगळे डाव मनाजोगे पडत नाहीत …….., मग काय ? घ्यायची ना माघार,….. तिथे मोडेन पण वाकणार नाही, असे ठरवले की वाटोळे झालेच म्हणून समजा. इथे फार धिटाई व शुराई दाखवण्यात अर्थ नसतो, कारण, पुढचे तीन-चार पत्ते ओढण्याच्या प्रयत्नात कुणाची तरी रमी लागतेच व तुमचा एकही प्युअर सिक्वेन्स नसल्यामुळे, डावाचे पूर्ण मार्क तुमच्या विरुद्ध लिहिले जातात. अश्या वेळेस तूमच्याकडे असलेले अव्यवहारी किव्वा अभद्र युती असलेले पत्ते तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरतात.

जर तेरा पत्यात एकही जोकर तुमच्याकडे आला नसेल तरीही तुमचा डाव यशस्वी होणे बऱ्याच वेळेस अशक्य असते. जीवनाच्या डावात देखील जोकरला अन्यन्य साधारण महत्व आहे, प्रत्येकाला या जोकरची भूमिका बऱ्याच वेळेस निभावावीच लागते. मला नेहेमी या जोकरचे कौतुक वाटते, हा कुणासोबतही मिळून मिसळून राहतो, त्यात त्याला कधीही कमीपणा वाटत नाही. हा गुण ज्याच्याकडे आला, तो जीवनाची नदी हसत खेळत पार करणारच, त्याला हे पक्के ठाऊक असते, की तो प्युअर सिक्वेन्स सोडला तर सर्व ठिकाणी हवाहवासा असतोच. तेरा पैकी प्युअर सिक्वेन्सचे तीन अथवा चार पत्ते सोडले तर बाकीच्यांच्या बरोबर त्याची गट्टी जमणार म्हणजे जमणार.

काही वेळेस मात्र जोकरचा भरणा झाला तर तुम्हाला रमी सुटणे महाकठीण होते, जास्त आचारी झाले की कढी सुद्धा नासू शकते, असा काहीसा प्रसंग आपल्या आयुष्यातही कधी कधी येतो.

आपल्या आधीच्या खेळाडूने टाकलेला पत्ता, उचलण्याआधी त्याचे किती महत्व आहे, हे अभ्यासून कृती करणारा खेळाडू नेहेमी जरी यशस्वी नाही झाला, तरी आटोपशीर राहण्यात तरबेज होतो. डावाचा भार हलका होण्यास याने नक्की मदतच होते.

इमप्युअर सिक्वेन्स, एकसारख्या पत्त्यांचा सेट, हे ही डाव सोडवण्यास नेहेमीच मदत करतात. असेच काहीसे जीवनातही असते, आसपास असणारी माणसे कदाचीत तुमच्याशी मैत्री करण्याइतपत तुल्यबळ नसतील, पण आयुष्याचा गाडा ढकलण्यात त्याची मदत नक्की होऊ शकते, पण त्यासाठी तुम्ही प्युअर असणे अत्यंत महत्वाचे आहे.

जगात कोणीही परफेक्ट नाही, तरीही प्रत्येकजण जीवनाचे रहाट ओढतोच ना? याचे कारण प्युअर सिक्वेन्सच्या भरभक्कम पायावर इमारतीचा डोलारा उभा असतो, त्यामुळे छोट्या छोट्या अडचणींचा सामना करण्याचे बळ प्राप्त होते, व रमीचा डाव यशस्वी होतो.

— विजय लिमये
9326040204

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..