नवीन लेखन...

रुपेरी गणेश दर्शन..

श्रीगणेश ही बुद्धीची, कलेची देवता आहे. या कलात्मक स्वप्नांच्या चंदेरी रुपेरी दुनियेत श्रीगणेशाने, रसिक प्रेक्षकांना अनेक चित्रपटांतून दर्शन दिलं असेल तर त्यात नवल ते काय?

प्रभातच्या ‘रामशास्त्री’ चित्रपटातील पेशव्यांच्या दरबारात त्याचीच पार्श्वभूमी आहे.. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटात श्रीगणेशाच्या भव्य मूर्तीची पूजा करताना गजराज दाखविला आहे..

मराठीतील ‘अष्टविनायक’ हा चित्रपट संपूर्ण अष्टविनायक ‘यात्रा’ घडवतो.. अलीकडच्या ‘उलाढाल’ चित्रपटात वाईच्या घाटावर गणपतीवर मकरंद अनासपुरेचे ‘हे देवाऽ तुझ्या दारी आलो..’ भव्य आणि दिव्य गाणे घेतलेले आहे..

‘अंगारकी’ नावाच्या मराठी चित्रपटात सुरुवातीलाच कैलाश खेरनं गायलेलं, श्रीगणेशाच्या भव्य मूर्तीसमोरचं समूह नृत्यगीत डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे..

हिंदी चित्रपटसृष्टीत गणपतीची भव्य मिरवणूक अनेकदा क्लायमॅक्स दृष्यासाठी वापरलेली आहे.. ‘अग्नीपथ’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या तोंडी ‘गणपती अपने गाव चले..’ व हृतिक रोशनच्या तोंडी ‘देवा श्रीगणेशा..’ ही गाणी क्लायमॅक्सच्या दृष्यासाठीच घातलेली आहेत.. या मिरवणुकीत खलनायकाचा खून होतो..

‘टक्कर’ नावाचा एक हिंदी चित्रपट, एका तेलगु चित्रपटाचा रिमेक होता.. त्यामध्ये गणपतीच्या मूर्ती मधून स्मगलिंग करताना दाखवले होते.. त्या मूर्तीच्या मिरवणुकीत जितेंद्र व संजीव कुमार ‘मूर्ती गणेश की, अंदर दौलत देश की..’ हे गाणं गाताना दाखवले होते..

‘हमसे बढकर कौन’ चित्रपटातचे टायटल साॅंगच श्रीगणेशाच्या आरतीचे आहे.. ‘देवा हो देवा, गणपती देवा.. तुमसे बढकर कौन..’ हे गाणं मिथुन चक्रवर्ती, अमजद खान, डॅनी, रंजिता, नीता मेहता, विजयेंद्र घाटगे, रणजित, काजल किरण, इत्यादी कलाकारांनी साकारलेलं आहे..

‘दर्द का रिश्ता’ चित्रपटातील ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ..’ हे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचं गाणं सुनील दत्तवर चित्रीत केलेलं आहे.. या गीताला कारूण्याघी झालर आहे.. त्याची मुलगी हाॅस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढत असते व इकडे वडील गणेश विसर्जनाला चाललेला असतो..

‘सत्या’ या मुंबईतील गुन्हेगारी विश्वावरील चित्रपटात गणेश विसर्जनाच्या समुद्रावरील मिरवणुकीत खुनी हल्ला दाखवलेला आहे..

एकूण काय या सर्व दिग्दर्शकांनी या बुद्धीदेवतेचा त्यांच्या सोयीनुसार उपयोग करुन घेतलेला आहे. त्या निमित्ताने श्रीगणेशाने सुखकर्ता दुःखहर्ताची भूमिका पार पाडलेली आहे..
त्याच गणरायाला विनंती आहे की, सध्या समाजातील स्त्रियांवर, अल्पवयीन मुलींवर जे नराधम अत्याचार करतात, त्यांना शासन करायला सध्याचे राज्यकर्ते, कायदेपंडित फार उशीर लावतात.. त्यापेक्षा तूच त्यांना असं शासन कर की ते शासन पाहून कुणीही पुन्हा असे कृत्य करायला धजावणार नाही…
जय गणेश!! जय गणेश!!

© – सुरेश नावडकर १३-९-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..