ट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो. हा प्रवास जसा मोठा तशी याची किंमत सुद्धा खूप मोठी आहे. ह्या टूर मध्ये आपण, जरी वेगवेगळे सुदंर रशियन प्रदेश पाहत जात असलो तरी, काही जेवणाच्या किंवा लांब प्रवासाच्या अडचणी भारतीयांना येतात. त्या अडचणी म्हणजे, खूप दिवसांचा रेल्वे-प्रवास, भारतीय भोजनचा अभाव, तसेच ट्रान्स मंगोलियन टुरसाठी मोजलेली मोठी किंमत! प्रवाशांच्या ह्या काही आलेल्या अडचणी पाहता, आम्ही (एक्सकूर्सीया टूर्स) एक वेगळी ट्रान्स सैबेरियन टूर आयोजली आहे जी मनोरंजक पण असेल आणि आपल्या बजेट मध्ये पण असेल!
रेल्वे प्रवास थोडा सुटसुटीत, आणि नावीन्यपूर्ण करण्यासाठी आम्ही एक प्रायोगिक मार्ग आयोजला आहे. मॉस्को, कझान, एकातेरिनबर्ग, ओम्स्क, सायबेरिया प्रदेश आणि इरकुस्त अशी काही मोठी रशियन शहरे या मार्गामध्ये येतात, या मधील काही ठळक रशियन शहरे आम्ही निवडली. ट्रान्स सबरियन रेल्वे प्रवासात एक सर्वात सुदंर टप्पा मानला जातो आणि तो म्हणजे रशियातील आणि जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – लेक बईकाल.
लेक बईकाल जवळून डोंगर मार्गातून जेव्हा ट्रान्स सैबेरियन रेल्वे जाते, त्यावेळेला नयनरम्य दृषांची रांग लागते. ह्या वेळेला लोकाग्रहास्तव रेल्वे हळू जाते आणि डेक वरून किंवा पुढे इंजिनापाशी व्हिडिओ किंवा फोटो स्टॉप घेतात. अशा वेळेला एका छोट्या गावात बाईकलपाशी निसर्गात दुपारचे जेवण पण केले जाते! रशियन गाणी गात, तेथील स्थनिक लोक जेवण देऊ करतात. तेथील, स्थानिक जेवण, व्होडका घेऊन सर्व प्रवासी आनंदात नाचत असतात.
लेक बाईकलची जैव-विविधता खूप सुदंर आहे जसे, नेरपा सिल्स. सील हा प्राणी सहसा समुद्रात आढळतो पण लेक मध्ये आढळणे जरा दुर्मिळच आहे. लकेमध्ये रशियन वेलनेस- साऊना म्हणजेच, रशियन बान्या करता येतो आणि इथेच आपला सगळा थकवा निघून जातो. ट्रान्स सैबेरियन टूर आपण लेक बईकाल पर्यंत करतो आणि पुढे मॉस्को विमानाने परत जातो. मॉस्को स्थलदर्शन करून आपण १३ दिवसांनी दिल्लीला परत येतो.
अधिक माहिती साठी संपर्क साधा
(Excursia Tours): +919890004007, +919890157300