आरवलं कोंबड
जाहलं झुंजूमंजू
किलबिलाट पाखरांचा
गोठ्यात हंबरती जित्राब
फुटलं तांबडं
प्रसन्न चराचर
सारं काही शुचिर्भूत
राऊळगाभारी घंटानाद
गवाक्षी कोवळी किरणे
चैतन्याचा बहर
श्वास सारे सुखावलेले
दिनक्रम कर्तव्याचा
रणरणता सूर्यप्रकाश
थकलेले श्रम प्रामाणिक
उतरलेले सांध्यपर्व
नभी, माखली गोधुळी
दीपलेली तिन्हीसांजा
नभा आलिंगीते यामिनी
चंद्रचांदण्यांचा खेळ
सुखाच्या मिठीत जग
दिवसा मागुनी रात
रात सरता उगवतो दिन
सृष्टीचे हे ऋतुचक्र
नितनीत अविश्रांत अविरत
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ११३.
२३ – ८ – २०२१.
Leave a Reply