यंत्रवत! झाला मानव
तंत्रज्ञानाचा मायाजाल
कृत्रिम जाहले जीवन
मृगजळी स्पर्श सुखाचे
मन:शांती धनसंचयी
ऋणानुबंध स्वार्थापोटी
निर्जीव, प्रेमभावनां
जगी शुष्क कोरडी नाती
पायमल्ली, संस्कारांची
नीतिमूल्येही झुगारलेली
हव्यास क्षणिक सुखाचा
कलियुगी! जग तळहाती
अंतर्मुख हो रे मानवा
साक्षी ही पंचमहाभूते
उदय अस्ताचे ऋतुचक्र
सृष्टीत आजही अखंडित
©️ विगसातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र ११२.
२२ – ८ – २०२१
Leave a Reply