कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
हात-पाय गार, काटे अंगी येती
नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा
सुकूनची जाते, हिरवे रान
शरिर राहते, घाम निथळून
लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
शोधण्या ढग, मन घेई धाव
थांबवितो कामे, वादळी वारा,
पर्जन्याचा मारा, पडताती गारा
पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे
आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply