मराठी चित्रपटसृष्टीतील “सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान हारवा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा ‘सामना’ हा चित्रपट.
या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. “सामना” चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. ‘या टोपीखाली दडलंय काय’ या गाण्यात स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा ‘सामना’ खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा ‘माईलस्टोन’ सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनवला गेला.
४५ वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.
खालील लिंक क्लिक करून “सामना‘ चित्रपट बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply