नवीन लेखन...

सांग दर्पणा कशी मी दिसते

सांग दर्पणा कशी मी दिसते…
ममतेचे औदार्य की फक्त आरसपाणी सौंदर्य?
मायेची सावली की फक्त शोभेची बाहुली?
ल्यायले जेंव्हा मी धैर्य, क्षमा, जिगर, हिम्मत हे अलंकार
तरीही नथ, पैंजण, बांगड्या, मंगळसुत्र म्हणजेच ‘मी’ हा नाही का वाटत चमत्कार?
का संभ्रम, का नकार?
अस्तित्वासाठी किती तुडवायचे अजून निखार?
सांग दर्पणा सांग कशी मी दिसते…?

सृष्टीचे सगुण रूप साकार, की धरणीला या भार?
थांब.. तू नकोचं बोलू नकोचं सांगू..
तुला पामराला का मी विचारावे?
तु हि देशील जुनेचं दाखले, जुनेचं पुरावे..
लादशिल माझ्या पाठीवरती बुरसटलेल्या विचारांचे ओझे.
दाखवशिल मला माझीचं जुनी ती ‘मूर्ती’
जिला नव्हती ‘स्व अस्तित्वाची’ महती..

हे, ऐक दर्पणा ऐक.. मी अशी दिसते…

“मुक्त मी, स्वैर मी..
स्वतंत्र मी, स्वच्छंदि मी.
मज नकोत बेड्या, नकोत बंधन
हवेत फक्त ह्रदयाच्या ख-या बंधांचे गुंफंण.
पु-या करण्या माझ्या स्वप्नांना घेते मी ऊंचचं ऊंच भरारी..
असले जरी ते माझेचं स्वप्न, ऊभारली आहे गुढी मी घराण्याच्या अन् देशाच्या अभिमानाची.
सुंदर बनवण्यास जीवन ‘जीवन’ झाले मी..
दिला जसा आकार तशी आकारले मी.
बसं..आता जाणीव झाली आहे मला माझ्या अस्तित्वाची..
जशी वाळवंटातल्या मनुष्याला थेंबभर ‘जळाची’.

(दर्पण): “चुकलेचं माझे, नाही ओळखले खरे रूप तुझे..
वदतो आहे हे खरे मी
घे कवेत अपराध हे माझे.
ही तूचं आहेस, तुझीचं खरी प्रतिमा आहे ही
आता नको नाकारु, नको झुगारु..
नको थांबू, नको थांबवू..
ऊंचचं ऊंच घे भरारी
भरारी घेण्या पंखांना तू दे ऊभारी”..
तू घे भरारी..

© – शिल्पा परांडेकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..