आजही स्मरते ओंजळ तुझी
बकुळ फुलांनी ओसंडलेली
तूच गे माझ्याच हाती दिलेली
प्रीती ,भावगंधात गंधाळलेली
तेंव्हा नुमजला अर्थ प्रितीचा
आज तीच प्रीत गहिवरलेली
अव्यक्त! साक्षात तू सामोरी
स्पंदनांना ओढ तुझी लागली
तळहातीच्याच या भाग्यरेखां!
अनामिक हीच लीला आगळी
प्रीतीविना कां ? जीवन असते
सांग तूच मला गे या सांजवेळी
आज हरविले जरी ते दिन सारे
तूझीच मूर्ती अंतरिच्या राऊळी
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३
३ – १ – २०२१.
Leave a Reply