हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला
विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला…. ।। धृ ।।
खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,
पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी
सैल कर तू पाश आपला…१,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी
कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी
नकोस देऊ वाव शंकेला…२,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
ते तर केवळ घर निराळे, मायेने भरलेले,
जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे
आठवण करीता येईन भेटीला…३,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply