सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.
साहित्य (Ingredients):
१/२ कप साबुदाणे – Tapioca pearls (Sago)
१ मध्यम आकाराचे बाफवून सोललेले बटाटे ( Medium size , peeled, steamed potato )
स्वादापुरते मीठ व साखर.
१/४ चमचा (टी स्पून) जीऱ्याची पूड.
ताजा लिंबाचा रस – चवी पुरता.
१/४ चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट
१/२ चमचा आल्याची पेस्ट
१ ( टेबल स्पून) चमचा तांदळाचे पीठ.
स्वादासाठी ओवा किंवा अज्वैन (carom seeds )
कृती:
१. साबुदाणा पाण्यात एक तास भिजवून ठेवा. संपूर्ण पाणी निथळून घ्या.
२. एका बाऊल मध्ये किंवा भांड्यात वाफवून कुस्करलेले बटाटे, पाणी निथळून काढलेले आणि नरम झालेले साबुदाणे, मीठ, जीऱ्याची पूड, आले-मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, ओवा किंवा अज्वैन (carom seeds ) ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.
३. मिश्रणात तांदळाचे पीठ घालून साधारण जाडसरच मिश्रण तयार करावे आणि ते चकली – पाडण्याच्या भांड्यात घालावे.
४. चकल्या बटर पेपरवर पाडून उन्हात सुकवाव्यात.
५. संपूर्ण ड्राय झालेल्या चकल्या ३० मिनिटे मायक्रोवेव्ह ओवन मध्ये भाजून घ्याव्यात.
— सौ. निलीमा प्रधान
Leave a Reply