महाराष्ट्रात सर्वांकडेच उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बहुतेकवेळा केली जाते. ही खिचडी चविष्ट असते. अनेकजण तर उपवास नसतानाही साबुदाण्याची खिचडी मुद्दाम बनवून खातात. ही खिचडी बनवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यातील एक पद्धत खाली दिली आहे.
साहित्य (Ingredients ):
१ कप साबुदाणे
१/२ कप शेंगदाणे ( Peanuts )
१ लहानसा बटाटा
१ चमचा (टी स्पून ) जिरे ( cumin )
१ ते २ चमचे (टी स्पून ) साखर
१/४ चमचा (टी स्पून ) हळद (Turmeric )
फोडणीसाठी तूप किंवा तेल.
२ ते ३ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
कढीपत्ता वरून भिरभिरवण्यासाठी
लिंबाचा ताजा रस
कोथिंबीर किंवा खोबरे सजावटीसाठी हवे असल्यास
कृती :
१. साबुदाणे स्वच्छ धुऊन एक ते दिड तास भिजवावेत.
२. साबुदाण्यातील पाणी पूर्णपणे निथळावे.
३. शेंगदाणे खरपूस भाजावेत. भाजलेल्या शेंगादाण्यांची साले दोन हातांच्या पंज्यात चोळून वेगळी करावीत.
४. यानंतर शेंगदाणे खलबत्यात / ग्राईंडर मध्ये बारीक करावेत.
५. कढईत फोडणीसाठी तूप किंवा तेल घ्यावे आणि ते गरम करावे. गरम असताना त्यात जिरे, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता व बटाटे (फोडी) घालून नंतर त्यात साबुदाणे घालावेत.
६. गरम करताना सुपात पाखडतो त्या प्रमाणे हलके हलके वर उडवीत गरम करत रहावे.
७. त्या नंतर शेंगदाण्याचे कुट, साखर, मीठ टाकावे.
८. गरमागरम खिचडी प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर किंवा खोबरे आणि लिंबाचा रस घालून खायला तयार…
— सौ निलीमा प्रधान
Leave a Reply