माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात होतो.
पन्हे पितांना वडील म्हणाले, अरे मी सांगतो म्हणून ऐक, पण मित्रांना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल.
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही अडल्ट होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण खरे मित्र बदलले नाहीत. पश्या पश्याच राहिला, घोड्याचा कधी बिपिन झाला नाही, देशपांड्याचा कधी मिस्टर देशपांडे झाला नाही, सँडीचा संदीप झाला नाही, मोरेचा आशय झाला नाही, सुज्याचा सुजीत झाला नाही, आशुचा आशुतोष झाला नाही तर फांज्याचा गिरीश झाला नाही. नम्या नम्याच राहिला, नमीत झाला नाही. संजय नाव कधी आवड्ले नाही, संजूची गोडी नाही त्यात. मंगेश दादाच राहिला त्याच दुसरे रूप कधी दिसलेच नाही. आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मेडल पोडीयमवर आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना ” अबे तू ……………है ” हे सांगायला कोणतेही दडपण नसते.
— संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
Leave a Reply