नवीन लेखन...

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  ।

ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।।

चमत्कार दिसून आला एके दिवशी  ।

राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।।

विज्ञानाने उकल केली या घटनेची  ।

खात्री करिता सत्यता पटली याची  ।।

चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  ।

त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।।

शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  ।

शरीरासाठी तेच शब्द कवच बनती  ।।

जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत  ।

शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत  ।।

हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी  ।

निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी  ।।

सदैव नामस्मरण चेतना देत राहतो  ।

रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..