सदाशिव अनंत शुक्ल यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्यात महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म २६ मे १९०२ रोजी झाला. स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.
स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्नं केला. लिखित साहित्याबरोबर स.अ. शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता.
ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले. मा.स.अ.शुक्ल हे १९६७ साली पुण्यात भरलेल्या ४८व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.स.अ.शुक्ल यांचे २७ जानेवारी १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
स.अ. शुक्ल यांची गाणी
एकटीच भटकत नदीकाठी गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
कुठला मधु झंकार गायिका श्यामा चित्तार. संगीत यशवंत देव
कुणाला प्रेम मागावे गायक मास्टर बसवराज
चकाके कोर चंद्राची गायक-गायिका – जी.एन्. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्. जोशी
चल रानात सजणा गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
जादुगारिणी सखे साजणी गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
तू तिथे अन् मी इथे हा गायक-गायिका – जी.एन्. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्. जोशी
दूर व्हा सजणा येऊ नका गायक-गायिका मन्नाग डे, आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट – या मालक
दे चरणि आसरा गायक राम मराठे
प्रीतिचा नव वसंत गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट – या मालक
बोल हांसरे बोल प्यारे गायिका निर्मला जाधव, संगीत शंकरराव सरनाईक, चित्रपट सौभाग्यलक्ष्मी
ब्रिजलाला गडे पुरवी गायिका हिराबाई बडोदेकर, संगीत केशवराव भॊळे-हिराबाई बडोदेकर, नाटक – सं. साध्वी मीराबाई; राग मिश्र पिलू
लाविते ग सांजदिवा गायिका आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट – या मालक
हले झुलत डुले पाळणा गायिका लता मंगेशकर, संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट – चिमुकला पाहुणा
माझे वडील ए पी नारायणगांवकर यांनी शुक्ल यांच्या अनेक गीतांना चाली दिल्या होत्या. त्यांच्या HMV records आहेत. दे चरणी आसरा, पंढरीनाथ नामाचा, आला जणू चंद्रमा, (राम मराठे), जादूगार नयन तुझे, रघुराज मनी (सुरेश हळदणकर) चतुरच मधुकर (भालचंद्र पेंढारकर) अशा अनेक.
माहिती साठी माझा संपर्क क्रमांक
९८६९१७०१३६