एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , “तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस”.
जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात “मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर.”
शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो “तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा.”
जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.
देवाच्या तत्वात – : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.
पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.
आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.
त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.
त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.
Leave a Reply