टपोरे डोळे,भव्य कपाळ आणि निरागस चेहरा हि साधनांची खासियत होती.
साधना मूळची कराची येथील सिंधी, ,वडील शिवराम व आई लालीदेवी शिवदासानी यांची मुलगी, जन्म २ सप्टेंबर १९४१ चा
साधनाचे मूळचे नाव अंजली. पण तिच्या वडिलांना बंगाली नटी साधना बोस खूप आवडे. त्यामुळे त्यानी तिचे नाव साधना ठेवले. तिचा काका हरी शिवदासानी, तो चित्रपटात छोटीमोठी काम करत असे. त्याची मुलगी बाबिता . अखंड भारताची फाळणी झाली आणि साधनांचा परिवार मुंबईला आला. तिच्या काकाची सायन मुंबईला किराणामालाची दुकाने होती. वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत साधनाचे शिक्षण आईने घेतले. आठव्या वर्षी जेव्हा आई तिला शाळेत घालण्यासाठी गेली तेव्हा शिक्षिकेला समजले साधना शाळेत गेलीच नाही. त्यावर ती खूप नाराज झाली. तिची आई म्हणाली “आम्ही फाळणी च्या धक्क्यातून गेलो आहोत आम्हाला तिला शाळेत घालणे शक्य नव्हते”.आई म्हणाली “ मी स्वता एक शिक्षिका होते. त्यामुळे मी साधनाला शिकवले.” मुख्याध्यापकाने साधनाची परीक्षा घेतली ती इतकी हुशार होती कि तिला पाचवीत प्रवेश दिला गेला. ती वडाळ्याच्या शाळेत जाऊ लागली. पुढे मॅट्रिक झाल्यावर घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे टायपिस्टची नोकरी करू लागली. जयहिंद कॉलेजात जात असताना नाटकात काम करू लागली. तिची ऊंची,गोरा रंग पाहून चित्रपटात काम करावेसे वाटू लागले.एका सिंधी सिनेमासाठी तिने शिला रामाणी हिच्यासोबत अबना या चित्रपटात काम केले.चित्रपटाच्या वेळी तिने शिला रामाणी कडे सही मागितली तेव्हा रामाणी म्हणाली “एक दिवस लोक तुझी सही मागतील “ तिला हिन्दी चित्रपटासाठी पहिली संधि मिळाली ती श्री 420 या चित्रपटाच्या “मुडमुडके ना देख मुडमुडके “ या गाण्यात को डान्सर म्हणून.
साधनाचे मासिकांतले फोटो पाहून शशधर मुखर्जीने तिला आपल्या हिमालय प्रोडक्शनसाठी महिना 750 रुपये पगारावर नोकरीला ठेवले. तिचे भव्य कपाळ पाहून चित्रपटांचे डायरेक्टर आर के नैयर यांनी तिला केसांसाठी वेगळा लुक दिला.(पुढे तो साधना कट नावाने प्रसिद्ध झाला) तो चित्रपट होता लव इन शिमला,या चित्रपटा दरम्यान तिचे आर के नैयर यांच्याशी प्रेम जमले पुढे त्या दोघानी लग्न केले. बीमल रॉय परख चित्रपटासाठी हिरोईन शोधत होते त्यानी साधनाचे फोटो पाहिले. पण ते मॉडर्न हेअरस्टाईलचे होते. चित्रपटाची हिरोईन साधी होती. त्यामुळे त्यांना साधनाचे भव्य कपाळाचे फोटो दाखवले व साधना निवडली गेली. परख हिट झाला .पुढे हम दोनो हीट झाला. एकदा ती साडी खरेदीला गेली असताना लोकानी ओळखले आणि दुकानाबाहेर प्रचंड गर्दी केली.1964 ला वो कौन थी हिट झाला.1966 ला मेरा साया हीट झाला.पुढे तिची चुलत बहीण बाबीता बरोबर गैरसमज झाले. अचानक तिला थायरॉईड रोगाने ग्रासले ती अमेरिकेत उपचारासाठी गेली. माधुरी मासिकाने तिला माधुरी रत्न सन्मान दिला. साधनाची चुलत बहीण बाबिता व रणधीर कपूर यांचे प्रेम जमले . पण राजकपूरच्या म्हणण्या प्रमाणे ती लग्नानंतर चित्रपटात काम करू शकणार नव्हती. साधनाने बाबिताची बाजू घेतली.पण बाबिताचे कोणीतरी कान भरले तिला वाटले माझ्या विरुद्ध साधनाने राज ला भडकावले. हे इतक्या टोकाला गेले की साधनाला बाबिता आंटी म्हणे रागाच्या भरात बाबिता म्हणाली “मला बेटी म्हणू नकोस कदाचित तूच मूल जन्माला घालू शकणार नाही.” साधना खरच मूल जन्माला घालू शकली नाही.मूल झाले पण ते मृत होते, थायरॉईड वाढत होता.पती वारले, एके काळची सुंदर डोळ्यांची साधनाचे डोळे विचित्र दिसू लागले. 1965 च्या युद्धात तिने आपले दागिने दान केले. सेक्रेटरी फ्लोराची मुलगी दत्तक घेतली.पतीच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाले होते . ती आशा भोसले यांच्या बंगल्यात भाड्याने राहू लागली. आशा भोसले यांनी तो बंगला बिल्डरला विकला . बिल्डर धमक्या देऊ लागला. चेहऱ्याचे पुनः ऑपरेशन झाले. तिने स्वताला जगापासून दूर ठेवले.शेवट पर्यन्त तिला दोनच मैत्रिणी होत्या वाहिदा रहमान आणि नंदा दोघीनि तिला शेवट पर्यन्त साथ दिली.
25/12/2015 ला साधना काळाच्या पडद्याआड गेली.
- रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply