सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये ,
एकदा झाला मोठा वाद,
सागराचे रौद्र रूप पाहूनी,
किनाऱ्याने दिलीच नाही साद…
फेसाळलेल्या लहरी मधुन,
तो ओकत होता आग,
सूर्य गेला समजवण्यास ,
पण तोही झाला बाद…
खवळलेल्या लाटांनी मग,
मस्तक आपटले किनाऱ्यावर,
हळूच वरती पाहुनी,
शिंपडले पाणी सूर्यावर…
शेवटी चमचमत्या चांदण्यांचं,
आकाश आले भेटीला,
सुंदर शांत संध्या,
होती त्यांच्या जोडीला…
आक्रोश करून सागराने ,
शेवटी स्मित हास्य केलेच,
दूर दृष्टीस गाभाऱ्यातील,
प्रीत मंदिर दिसले,
प्रीत मंदिर दिसले…
– श्र्वेता संकपाळ