नितळ लोचनी नीरव शांत चराचर..
ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज..
एकांती उसळते आर्त भावनांचे गुज..
बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।।
माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा..
प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी..
प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर..
ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।।
महाकाय , अथांग महासागर हृदयी..
भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी..
निरवतेत , घोंगावती अंतरी गतस्मृती..
उलघाल विकल मनी निष्पाप प्रीतीची..।। ३ ।।
खुणावते जीवा ती अवीट सागरमाया..
किनारी साक्ष , रुतल्या प्रीतपाऊलांची..
भरती , ओहोटीतही , प्रतीक्षेत किनारा..
आसक्ती स्पंदना , केवळ तव प्रीतीची.।। ४ ।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र.४२.
दिनांक:- १७ – ३ – २०२१.
Leave a Reply