सहज मिटल्या डोळ्यांत
का तू अलगद आठवावा
पाऊस मनात रिमझिम
का तू मनात आल्हाद मिटावा
कसली ही भूल मनीची
आरक्त मी तुझ्यात व्हावी
न उलगडले गुपित मज हे
का तुझी वाट मी पाहवी
कसले हे चांदण टिपूर
हृदयाची हितगुज उमलावी
न बोलता मी अबोल अशी
अंतरीची साद तुला कळावी
येशील का रे तू असा
नदीकाठी मी वाट पाहवी
हात तुझा हातात अलगद
भान हरपून वाट चुकावी
न बोलणे कसले व्हावे दोघांत
स्पर्शाची गुज अंतरी उमटावी
निसर्ग खुणावे दोघांना अवखळ
डोळ्यांत तृप्तता दोघांनी लुटावी
ये अलवार सख्या तू असा
वाट मी कितीक पाहवी
थेंब थेंब जमले टिपूर असे
तुझ्या आठवणीत मोहक मी लाजुनी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply