सहज फुल झाडावरील अवचित सुकले
मनाचे बांध काहूर मनी कसे तुटले
चुकल्या अक्षरात कुठे मग
शब्दांचे खेळ अनामिक रंगले
तुटल्या काजळ वेदना
भावनांचे गहिवर तुटले
कोण कोणास बोलले
बंधाचे बांध अलगद फुटले
ओल्या सांजवेळी कोण
हृदयस्थ अलवार झाले
काळीज तोडून कोण
हलकेच दूर दूर गेले
मिटल्या कळ्यात काही
पाकळ्यांचे गजरे गुंफले
मनात मोहर कुणाचा
पानगळीत पर्ण भरकटले
कोण येति अलवार जवळ
माळेत सर गुंफून मोती सजले
अळवावरील पाण्याचे थेंब
सांडून कोरडे ओघळ का निसटले
मनाच्या गुंतण्यात भाव मिटले
डोळ्यांत आल्हाद थेंब उरले
मोहरल्या मिठीत भाव निस्तेज
मन अलगद होरपळून गेले
विस्तीर्ण नदीचा काठ भवती
कोण एकांत मनात रडले
शब्दांचा भरला बाजार अवेळी
घाव वर्मी नकळत का पडले
चुकल्या शब्दांत मेळ वाक्यांचे चुकले
कोण मनाच्या तळ्यात खोल रुतून गेले
गुलाबाच्या रंगात रंग खुलून बहरले
काट्यात तुटल्या पाकळ्या मन निःशब्द रडले
मांडून खेळ कल्पनेचा अबोध
मनात कोंडून भाव आहे
कवी रंगवतो शब्द पसारा सारा
चंद्र ही पोर्णिमेत झाकोळून आहे
दुःखाचे प्रकार अनेक भवती
सुखाचे शब्द लोपुन बंदिस्त आहे
कोण येति अलगद आयुष्यात
जातांना वादळ घोंघावून वाहे
हे सार जीवनाचे अंतिम
प्रेमात गुलाब ही रुसून आहे
कातर संध्याकाळी किरणांचे
रंग हरवून रवी पश्चिमेस रुसून आहे
कवीचे मन कल्पनेत रंगले
भाव भावनांचे बाजार उघडले
कोण येऊन पांथस्थ अवचित
ओढ मिटून अश्रुंचे बांध फुटले
निर्मोही मनात कसले कोंदण रुतले
मोहाचे मोहजाळ का अंतरी गुंतले
रडवून भावनात माणसांचे नाते तुटले
न विसरते ओढ मनात अश्रुंचे थेंब उरले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply