नवीन लेखन...

सहज तू म्हणालास विसरुन तू सार जा

सहज तू म्हणालास
विसरुन तू सार जा,
बहर होता तो एक
मनातून मिटून सगळं टाक..
सहज सार विसर म्हणलं
तरी विसरता येत नाही,
मनाच्या तारा छेडल्या तू
आता आठवणी मिटत नाही..
बहर तर सगळ्यांचा असतो
पान,फुलं,अगदी निसर्गही बहरतो,
स्त्री मनावर फुंकर मारता मात्र
कहर तो जरा मन कल्लोळ होतो..
सहज सोप्प तुला वाटतं तरी
स्त्री असते मुळात हळवी,
गुंतून जाते ती अबोल जेव्हा
तेव्हा न दिसते तिला कुठली भीती..
अंतर मन मग ओल बावरं
त्यात प्रत्येक स्त्री मोहरते,
पुरुष म्हणतो विसर सार तू
तेव्हा स्त्री त्याला कळलेली नसते..
गुंतल्या जातात मुग्ध भावना
एका वळणावर स्त्री पुरुष येता,
आकर्षण हे दोघांत युगानयुगे असते
न चालतात मग इथे कुठल्या मात्रा..
सगळं काही विसरलं तरी
अस्तित्व पुसलं जातं नाही,
तू पुरुष अन मी स्त्री फरक
हाच तो मिटला जातं नाही..
आड वाटेवर वाटा अचानक
वाकड्या साऱ्या एकदा होतात,
स्त्री आणि पुरुषाला एकत्र आणून
वाटा मात्र वेड्यावाकड्या होतात..
नसतं इतकं सोप्प मग स्त्रीला
गुंतलेल्या भावनेतून बाहेर येणं,
पडझड तिच्या मनाची होते
काहूर तिच्या अतरंगी अलगद वेढतं..
समजल्या नाही स्त्री भावना
तरी अबोध हळवी ती होते,
व्याकुळ होतात काही आठवणी
त्यात अंतरंगी तिचीच होळी पेटते..
मन नसेल तो माणूस नसतो
भावना नसेल तर तो भाव नसतो,
स्त्री नसेल तर ती जाणीव नसते
पुरुषाला स्त्रीची सल कळतं नसते..
सोडवता येतं नसेल तर
गुंताच कुठला सोडू नये,
आणि मन मोहरलं कुणात
तर भाव व्याकुळ होऊ नये..
पुरुष जेव्हा स्त्री जन्म घेईल
तेव्हा कळतील साऱ्या स्त्री भावना,
न विसरते स्त्री मग काही भावना
निसर्गतः असतात कोमल तिच्या जाणिवा..
देवाने बनविले स्त्री आणि पुरुष
मोहरतात दोघांच्या नाजूक भावना,
परी स्त्री तुटते तडाख्यात त्या वाऱ्याच्या
पुरुष राहतो किनाऱ्यावर आल्हाद जरासा..
नकळत स्त्री गुंतून जरा जाते
पुरुषात अलवार वेल्हाळ होते,
माहीत असते समोर वादळ आहे
तरी आल्हाद स्वतःला झोकून देते..
भावनांचा मोहक खेळ हा मग
प्रत्येकजण एकदातरी खेळतो,
कुणी गंधित अत्तरात गंधाळतं
तर कुणाच्या भावनांचा दगड होतो..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..