एका दिवशी “साहेब” आणि “आर्मस्ट्रॉन्ग” एका दुकानात गेले.
“आर्मस्ट्रॉन्ग”नी दुकानातून ३ चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा “आर्मस्ट्रॉन्ग” म्हणाले, बघा मी किती चतुर आहे. दुकानातून ३ चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही.
“साहेब” म्हणाले, मी तुम्हाला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. “साहेब” दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला जादू दाखवतो.
दुकानदार : दाखवा राव.
“साहेब” म्हणाले, मला एक चॉकलेट द्या.
दुकानदाराने चॉकलेट दिले. ते “साहेबां”नी खाल्ले.
त्यांनी पुन्हा एक चॉकलेट मागितले.
दुकानदाराने दिल्यानंतर त्यांनी दुसरे चॉकलेट खाल्ले.
आता “साहेबां”नी तिसरे चॉकलेट मागितले.
दुकानदाराने ते दिल्यानंतर “साहेबां”नी ते खाल्ले.
दुकानदाराने विचारले, यात जादू कुठे आहे…?
साहेब : आता तुम्ही “आर्मस्ट्रॉन्ग”चा खिसा तपासा…तुम्हाला तिन्ही चॉकलेट मिळतील.
याला म्हणतात “साहेब” !
Leave a Reply