नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

जीवनात अशा गुरुवर्य , साहित्यिक , कलावंत , विचारवंत यांच्या योगायोगाने लाभलेल्या प्रदीर्घ सहवासाची शिदोरी ही मला आत्मिक खुप श्रीमंत आणी समृद्ध करून गेली. तसं पाहिलं तर जीवन खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय असतं ? जगातील भौतिक सुखानं तृप्त होणं ! आनंदी होणं ! वैभवाची सर्वांग सुंदर छत्रचामरे मिरवणं म्हणजे सुख असतं कां ? अर्थात याच्या उत्तराचे विविध कङ्गोरे आहेत ..! पण उत्तम विवेकी वैचारीकतेन परिपूर्ण , समृद्ध अशा व्यक्तीन्चा सहवास लाभला तर जीवनाचं सार्थक होतं असं मला वाटतं !….असा सहवास मला लाभला हेच पूर्वसंचित असावे.

व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.

मला त्यांना पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. माझी ओळख शिवदे यांनी त्यांना करून दिली. पुढे सहाजिकच नानांचे माझे मैत्रसंबंध छान जुळून आले. अनेकवेळा आम्ही शांताबाई शेळकेंच्या घरी भेटलो. नाना कविवर्य दवी.केसकरांच्या सुपरिचित होते. ही तर दुधात साखर होती माझ्यासाठी .मी मुंबईत असतांना देखील नानांची गाठ पडत असे. त्यांचे राहणीमान एकदम साधे , नेहरू शर्ट ,पायजमा , खांद्यावर नेहमी शबनम बॅग, वेळप्रसंगी जॅकेट .कुठलाही बडेजाव नाही. आणि अगदी शांत , सोज्वळ नम्र होते. मोठ्ठी माणसं सर्वार्थानं मोठ्ठी असतात. ते शब्दप्रभु होते. त्यांची सर्व प्रकारची , सारीच गीते अलौकिक भावप्रधान शब्दलालित्यामुळे अजरामर झाली. आजही प्रत्येकच्या ओठावर आहेत. त्यांचा नुसता सहवासी स्पर्श हा माझ्या जीवनात मार्गदर्शक आशीर्वाद ठरला.

जीवनात पावलोपावली विविध स्वभावाच्या अनेक व्यक्ती सर्वत्र भेटतात. त्या प्रत्येकाचे अनुभवही विविध प्रकारचे असतात ..आणी ती आपल्या जीवनातील एक अंतरिक साठवण असते..आणी याच आठवांच्या साठवणीवरच आपले जीवन मोहरत असते. या सर्वातुन आपल्या जीवनावर घडणारे संस्कार अत्यन्त महत्वाचे असतात ..भौतिक जगातील प्रत्येक क्षेत्रातील यशाचा भक्कम पाया हा निर्विवाद तुमच्यावर परिस्थितिने घडविलेल्या संस्करावरच भक्कम स्थिरावलेला असतो.
म्हणून संस्कार , संस्करण अत्यंत महत्वाचे असते. आणी संस्कार हे सहवासातूनच ,संगतीतूनच घडत असतात. म्हणून व्यक्तीगत जीवनात सहवासाच मोल खुपच मौल्यवान आहे.

मुंबईमध्येही बरेच काळ माझे वास्तव्य झाले. माणसांच्या गुणावगुणांचे जवळून दर्शन झाले.सर्वार्थांन मोठ्ठी असणारी माणसं ही मनानंही किती मोठ्ठी असतात किती प्रेमळ असतात याचेही दर्शन झाले तर गर्भश्रीमंत असून देखील काही माणसं मनांनं किती दरिद्री असतात याचाही अनुभव आला..! पण आपण संयमानं आपण फक्त चांगले अनुभवच लिहावेत ! सांगावेत !समाजात सर्वसामान्यत: ” ज्यांची पांचही बोटे तुपात आहेत “( म्हणजे हे खुप सुखात आहेत ) अशी म्हण समाजात प्रचलित आहे. मी तर माझे पूर्वायुष्य आठवले तर म्हणतो माझी ” दहाच्या दहा बोटे तुपात आहेत ”
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पनाच वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची जीवनातील अपेक्षांची मर्यादाही वेगळी असते.कुणाची ५००’ फुटावर तर कुणाची अपरिमित असते. प्रत्येकाची अभिरूची वेगळी असते.वैयक्तिक स्वातंत्र्य असते . हे जरी खरे असले तरी संस्कारीत जीवनमूल्य महत्वाची असतात .! संस्कार करून संस्कार होत नसतात तर ते घडावे लागतात आणी ते केवळ सहवासानेच घड़तात ..!
गुरुवर्य डॉ. नम.जोशीसर यांचा माझा सहवास प्रदीर्घ आहे.अनेक कार्यक्रमात आम्ही बरोबरही होतो. त्यांची अनेक व्याख्याने मी ऐकली आहेत. नगरला माझे मित्र श्री . देवेंद्र वाधवा यांच्या *जादुची कांडी* या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो. त्यावेळी डॉ. नम.जोशी सरांच्या व्याख्यानात संस्कार या विषयाबद्दल ओघवती चर्च्या झाली . डॉ. नम. म्हणाले ” संस्कार करता येत नाहीत तर ते सहवासानेच घड़तात ! आणी त्याबद्दल जी गोष्ट सांगितली ती खुपच मननिय ,चिंतनीय होती.

एका सुसंस्कृत घरात नित्य दिनचर्ये प्रमाणे साग्रसंगीत पूजापाठ होत असे.घरातील ज्येष्ठ यजमान ते करीत असत. शुचिर्भुत झाले ,स्नान झाले की लगेचच अंगणामधील बागेतील फुले ,पत्री , तुळस ,बेल या गोष्टी फुलांच्या परडित गोळा करून माजघरात असलेल्या देवघरातील देवांची पूजा करीत असत.पण एकदिवस ते फुलांची परडी घेवून जायचे विसरतात. स्नान झालेले असते.पण पुन्हा स्नानघरातून परडी आणण्यासाठी माजघरात जाण्याचा कंटाळा करतात आणी आपल्या जवळ असलेल्या उपरण्याच्या सोग्यातच बागेतील फुले गोळा करतात .. नित्यानेमा प्रमाणे पूजापाठ करतात . एवढ्यात त्यांचे एक मित्र त्यांचेकड़े येतात. बाहेर दीवाणखान्यात बसतात. पूजा झाल्यावर यजमान बाहेर येतात तेंव्हा त्यांचा मित्र त्यांना म्हणतो.. “अरे आज तू काय अत्तर वगैरे लावले आहेस काय? खुप सुंदर सुवास येतो आहे ..तेंव्हा यजमान नाही असे म्हणतात. आणि सांगतात ” अरे मी आज बागेतील फुले आणण्यासाठी जाताना फुलांची परडी नेण्याचे आज विसरलो होतो . मग या उपरण्याच्या सोग्यातच सगळी फुले गोळा केली होती . त्या फुलांचाच वास या सोग्यालाच येतो आहे ..!!!

तात्पर्य – उपरण्याच्या सोग्याला या फुलांचा गंधित सहवास क्षणभर लागला तरी त्या उपरण्याला सुंदर गंधित सुवास येवू लागला…हाच गंधसंस्कार त्या उपरण्यावर झाला होता.. तो केवळ फुलांच्या सहवासाने..!!!*

तेंव्हा उत्तम सहवासाने उत्तम संस्कार होत असतात.संस्कार करूया म्हणून होत नसतात …!!!

(पुढील १९ व्या भागात अशीच एक गोष्ट)

© वि.ग.सातपुते
9766544908
(पुणे मुक्कामी)

२९ – ११ – २०१८

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..