स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन..
माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो… काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा….
चिरून तो काळाचा पदडा
सह्याद्री पुन्हा गहीवरणार
जाणता राजा शिवछत्रपती
अवतार विलीन तो होणार…
केले उभे हे स्वराज्य त्यांनी
लेक जिजाऊ मातेचा तो असा..
मुघली शासन मोडीत धरी
झुंजे वाघ सह्याद्रीचा तो असा..
नथ मस्थक झाली ती युगे
अखंड स्वराज्य श्रीची रे ईच्छा..
हाती धरून एक एक मावळा
केली स्वराज्याची पुर्ण ईच्छा..
सह्याद्री चौफेर पराक्रम त्याचा
दुमदुमली मराठी माती अशी
गड ,बुरुज देहहरवून देई लढा
बलिदानी लाल झाली माती अशी..
चरित्र शिवाजीचे ऐकता
चैतन्य प्रत्येक रे मनी पेटे..
धकधक करुनी धमण्या
अस्मिता ह्दयी, ती दहक पेटे..
असा वाघ जेव्हा गडबडला
काळाचा ओघ तो जणू चढला
अचानक रोग रुपी शुत्रूचा
नकळत हल्ला देवाला अडला..
ओठी एक नाव ते शुंभू शुंभू
एक बाप असा व्याकूळ झाला..
भेद काळाचा नाही कधी कळला
माझ्या राजाचा प्राण आडकला..
शुंभू राजे होते तेव्हा पन्हाळी
रायगडाला लागली हो जिव्हाळी
राजघराण्यातील सगळे दु:खी
राज्य कारभाऱ्याच्या देव जाप मुखी..
लागे मनी चाहूल शुंभू राजास
मन बोले, देई हाक पित्यास..
अस्वस्थ झाले पुत्र युवराज
कुठे काही घडतं ?.. काय ते राज .?
चाले प्रयत्न शरर्थीचे , वैद्य लढे
एक एक अनुभव आज मागेपढे
नाही असर होई जेव्हा ती दवा
सगळ्यांनी मग मागितली दुवा…
नाही कामी आली दवा, दुवा
स्वराज्याचा प्राण तो हरवला
खेळी आज काळाची ही अशी
माझा जाणता राजा हरवला….
उमाकांत कळे
अकोला
९९२२८५५५३९
http://umakantk.blogspot.com
“आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन
Leave a Reply