मराठी चित्रपटसृष्टीत नायिकांची आजवरची जी परंपरा आहे, त्यापेक्षा काहीशी वेगळी अशी सई ताम्हणकरची इमेज आहे. त्यांचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगली येथे झाला. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.
इंडस्ट्रीत स्वबळावर तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते.
मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले. सईच्या चित्रपटांनी गेल्या तीन-चार वर्षांत व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. सनई चौघडे, नो एंट्री पुढे धोका आहे, पुणे 52, टाइम प्लीज, दुनियादारी, पोरबाझार, प्यारवाली लव्ह स्टोरी, क्लासमेट्स, लालबाग परळ, तू ही रे आदी मराठी चित्रपटात सईने काम केले आहे.
गजिनी या हिंदी चित्रपटातून सईने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि नंतर ब्लॅक अँड व्हाईट, सिटी ऑफ गोल्ड, हंटर हे हिंदी चित्रपट सईने केले. अनुमती या मालिकेत पण तिने काम केले आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असते, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचे यश हे गणित गेल्या काही वर्षांत जमून गेले आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा सर्वजण अवाक झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply