नवीन लेखन...

सजीवांचे शरीर आणि आत्मा

मानवाला आणि प्राण्यांनादेखील आत्मा असतो असा सगळ्यांचा दृढ विश्वास आहे. हजारो वर्षांपासून सर्व धार्मिक ग्रंथात ही संकल्पना रूढ केली आहे. वनस्पतींची वाढ होते आणि त्यांचे प्रजोत्पादनही होते म्हणजे त्यांच्यातही दिव्य चेतना म्हणजे आत्मा असलाच पाहिजे.गीतेच्या शिकवणीनुसार आत्मा अविनाशी असून तो अनेक जन्मात निरनिराळी शरीरे

धारण करतो एका जन्मातील शरीर जीर्ण झाले म्हणजे ते टाकून, तोच आत्मा नव्या शरीरात प्रवेश करतो, आणि पुन्हा जन्म घेतो. हे नवे शरीर मानवाचेच असेल असे नाही, ते कोणत्याही सजीवाचे असू शकते. तो आत्मा, कोणत्या सजीवाचे शरीर धारण करतो हे त्या जुन्या शरीराने केलेल्या बर्‍यावाईट कर्मांवर अवलंबून असते अशीही भावना आहे. शरीराने केलेल्या सत्कर्मामुळे आत्म्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते अशीही शिकवण आहे.जगभरच्या जातीजमातीत, प्रत्येक धर्मात आणि सगळ्याच देशात असा समज आहे की सजीवांच्या शरीरात, ते सचेतन असेपर्यंत आत्मा असतो. शरीर अचेतन झाले म्हणजे त्यात आत्मा नसतो, तो त्या शरीराला सोडून गेलेला असतो.सर्व सजीवांना ‘आत्मा’ आहे असा सर्वांचा विश्वास आहे. म्हणजे अगदी लहानात लहान जीव-जंतूंनादेखील, ते सचेतन असल्यामुळे, त्यांना आत्मा असावयास हवा. रोगराईस कारणीभूत असलेल्या जीवाणू आणि विषाणू यांनाही आत्मा असावयास हवा कारण योग्य परिस्थितीत त्यांचीही प्रजा वाढते, तेही प्रजोत्पादनक्षम आहेत. पण त्यांचे प्रजोत्पादन अतर सजीवांप्रमाणे नरमादीच्या मीलनातून न होता पेशी विभाजनामुळे होते. त्यांना अतर सजीवांप्रमाणे मेंदू आणि अतर अवयव नसतात. परंतू त्यांचे जीवनकार्य चालते म्हणजे त्यांना आत्मा असलाच पाहिजे.आपल्या घरांत चिंच, वाल, भोपळा, पारिजातक, गोकर्ण वगैरेंच्या बिया पडल्या असतात. त्यांना वर्षानुवर्षे अंकूर फुटत नाही. परंतू त्या झाडांचे सर्व आनुवंशिक गुणधर्म त्या बियांत, डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात संकेतावस्थेत बंदिस्त असतात. त्या झाडाचे खोड कसे असावे, पाने फुले फळे कशी असावीत, झाडाची उंची किती असावी, झाडाचा आकार कसा असावा वगैरे संकेत, निसर्गाच्या भाषेत, आज्ञावलीच्या स्वरूपात म्हणजे आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात या बियात बंदिस्त असतात. जोपर्यंत आपण या बिया जमिनीत पेरीत नाहीत आणि थोडे पाणी, सूर्याची उष्णता पण एकदा का, त्या बिया चांगल्या जमिनीत पेरल्या, त्यास दररोज थोडे पाणी घातले, त्या जागेवर चंागला सूर्यप्रकाश पडू दिला, हवा मिळू दिली तर चार पाच दिवसांत अशी कोणती नवी नवलाई घडते की त्या बियांत अचानक जागृतावस्था येंऊन डीएनएच्या स्वरूपात बंदिस्त असलेले संकेत उलगडायला लागतात, बंदिस्त आज्ञावली कार्यान्वित होते आणि त्या बियांना अंकुर फुटतो, झाडाचा जन्म होतो, त्या अंकुराचा एक भाग, मूळ म्हणून जमिनीखाली वाढू लागतो आणि एक भाग खोड आणि पाने या स्वरूपात जमिनीच्या पृष्ठभागावर वाढू लागतो. याचा अर्थ असा की आनुवंशिक संकेत उलगडायला लागण्याची प्रक्रिया सुरू झाली, सांकेतिक आज्ञावली कार्यान्वित झाली, म्हणजे झाडाचा जन्म झाला असे म्हणता येईल, म्हणजेच आत्म्याचा प्रवेश झाला असेही म्हणता येईल.मानवी जन्म कसा होतो हे आता, विज्ञानामुळे बर्‍याच खात्रीलायक स्वरूपात समजले आहे. त्याचे पूर्णांशाने आकलन झाले आहे असा दावा विज्ञानाने करू नये. कारण जितके अधिकाधिक संशोधन होते आहे तितके ज्ञानाचे क्षितीज विस्तारते आहे.शुक्राणू आणि बीजांड किंवा पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचे जेव्हा फलन होते तेव्हाच फलित झालेला गर्भ किंवा बीजांकुर यांचे गुणधर्म कोणते असणार? त्यांची वाढ कशी होणार ? वगैरे अनेक आनुवंशिक बाबी जनुकांद्वारे ठरविल्या जातात. एकाच मातापित्यांच्या अनेक अपत्यात बराच फरक
असू शकतो तसाच एकाच वृक्षाच्या अनेक बियांपासून निर्माण झालेल्या रोपांतही काही फरक असायला हवा.मानवाच्या आणि इतर सजीवांच्या बाबतीत, स्त्रीचे (मादीचे) बीजांड आणि पुरूषाचा (नराचा) शुक्राणू यांचा संयोग झाला म्हणजेच सजीवाचा मूळ पिंड निर्माण होतो, आणि तो पिंड वाढायला लागतो, याच क्षणी त्या पिंडात आत्म्याचा प्रवेश झाला असेही म्हणता येईल. नवीन पिंडात चैतन्य निर्माण होते. हा मूळ पिंड शून्यातून निर्माण झाला असे म्हणता येणार नाही. कारण शुक्राणू, पित्याच्या शरीरातून आणि बीजांड, मातेच्या शरीरातून, आलेले असतात तर त्यांतील आनुवंशिक संकेत आणि आज्ञावल्या मातापित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांतून आलेले असतात.बरेच वेळा आपणांस असा अनुभव येतो की, वीज गेली की पंखे फिरण्याचे थांबतात, दिवे प्रकाश देणे बंद करतात, वीजेमुळे अुष् झ् निर्माण शेगड्या, हीटर देणे करून लागतात अुतेवढ्यात विजेचा प्रवाह सुरू होतो आणि पंखे फिरू लागतात, दिवे पकाश देऊ लागतात, फ्रीज सुरू होतो आणि ए.सी. सुरू होऊन हवा थंड होऊ लागते. म्हणजे आपल्याला पंखे, दिवे आणि इतर विजेची यंत्रे यंत्राचा आत्मा म्हणजे ‘वीज’ आहे असे म्हणता येईल. वीज असली म्हणजे ही उपकरणे काम करतात आणि वीज गेली की ही उपकरणे बंद पडतात. स्विच बंद केले तरीही ही उपकरणे बंद पडतात आणि स्विच ऑन केले म्हणजे ती सुरू होतात. म्हणजेच ‘स्विच’ हे उपकरण, या यंत्रात वीजरूपी आत्म्याला प्रवेश देणे किंवा प्रवेश नाकारणे असे कार्य करते.वनस्पतींच्या बिया जमिनीत पेरल्या नाहीत तर त्यांना अंकुर फुटणार नाहीत आणि त्या जमिनीत पेरल्या, त्यांना हवापाणी आणि पकाश मिळाला की अंकुर फुटतो. म्हणजे बिया पेरणे आणि न पेरणे या कि्रया ‘स्चिच ऑन’ आणि ‘स्विच ऑफ’ ह्या क्रियांप्रमाणे आहेत. त्यानुसार वनस्पतींच्या आत्म्याला कायाप्रवेशाची संधी देणे किंवा ती ना
कारण्याची क्रिया घडते. संततिनियमनाची साधने वापरणे किंवा नरमादीचे मिलन न होणे ही आत्म्याला सजीवात पिंडप्रवेश किंवा कायाप्रवेश नाकारण्याची क्रिया तर नैसर्गिक किंवा कृत्रिम गर्भधारणा होऊ देणे म्हणजे आत्म्याला कायाप्रवेश करण्याची संधी देण्यासारखेच आहे.एखादे उपकरण बिघडले म्हणजे वीज असून आणि स्विच ऑन केले तरी उपकरण

कार्य करीत नाही. कारण त्या उपकरणात वीजरूपी चेतना प्रवेश करू शकत नाही. त्यांतील दोष दूर केला किंवा खराब झालेल्या घटकाच्या जागी पुन्हा नवा घटक घातला म्हणजे उपकरण पुन्हा कार्यक्षम होते. सजीव आजारी पडला म्हणजे वैद्य किंवा डॉक्टर औषधोपचार करतो किंवा सर्जन शल्यक्रिया करतो आणि रोग्यास बरे करतो त्यातलाच हा प्रकार आहे. परंतू उपकरण किंवा सजीवाचे शरीर दुरूस्तीपलीकडे गेले म्हणजे त्याचा मृत्यू झाला असे समजावे.त्याचे घटक किंवा अवयव वापरून दुसरे बिघडलेले उपकरण दुरूस्त झाले किंवा दुसरा रोगी बरा झाला तर अंशत: पुनर्जन्म झाला असे समजावे. सजीव बेशुध्द होतो किंवा कोम्यात जातो तेव्हा त्या शरीराची जाणीव नष्ट झालेली असते, परंतू चेतना किंवा आत्मा ते शरीर सोडून गेलेला नसतो. म्हणून शरीर जिवंत असते आणि जाणीव परत आली की ते परत पूर्वीसारखे कार्यक्षम होण्याची शक्यता असते.वनस्पती किंवा सजीव वयात आले म्हणजे ते प्रजोत्पादनक्षम होतात. वनस्पती आपापल्या प्रजातींच्या बिया निर्माण करतात. तर सजीवांच्या माद्या बीजांडे आणि नर शुक्राणू निर्माण करतात. योग्य परिस्थितीत प्रजोत्पादनही करतात आणि आपापल्या प्रजातींचे आनुवंशिक संकेत पुढच्या पिढीत उतरवितात. हाच पुनर्जन्म म्हणता येईल. आनुवंशिक तत्वच जन्म आणि पुनर्जन्म घेत असते. असा पुनर्जन्म स्वत:च्याच प्रजातीत होणे शक्य आहे, इतर प्रजातीत किंवा योनीत नाही.कोणत्याही उपकरणाची ऊर्जा, उपकरणाच्या
र्व भागात खेळत असते म्हणूनच ते उपकरण त्याला नेमून दिलेले कार्य करीत असते. वनस्पती आणि सजीव यांच्या सर्व पेशी कार्यक्षम असतात म्हणजे त्यांच्यातील चैतन्य सर्व पेशीत संचारलेले असते. म्हणजे आत्मा एखाद्या विविक्षित ठिकाणी वास न करता तो सर्व शरीरातच असतो असे मानता येईल.आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य, आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा, आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत. आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे.सजीवाचा मृत्यू होण्यापूर्वीच प्रजोत्पादन झाले असल्यामुळे पूर्वजांच्या अनेक पिढ्यांकडून आलेले आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरिअल, आनुवंशिक वारसा तुन्ही पुढच्या पिढ्यात यशस्वीरित्या संक्रमित केलेला असतो. हाच तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म. सजीवांचे आनुवंशिक संकेत हे लाखो पृथ्वीवर्षांपासून एका पिढीतून पुढच्या पिढयात जात असल्यामुळे आत्मा अविनाशी आहे हे गृहीतक एका अर्थी खरे आहे.

— गजानन वामनाचार्य,

180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई 400 075.022-25012897, 9819341841.
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2011.

 

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..