नवीन लेखन...

सकाळ

कुणी उधळला क्षीतिजावरती
रंग केशरी हा सांगा
मळवट भरल्या उंच टेकडया
कुठे निघाल्या पर्वत रांगा
भिरभिरणारे पंख चिमुकले
का उधळले चौखूर
कुशीत घेऊन आभाळ सारे
पक्षी उडाले दूर दूर
झाडे वेली होऊनी जागी
फुले कुणाला वाहतात
हिरवी हिरवी तृणपाती
अजूनी दवाने नाहतात
उंचावूनी मान आपुली
माड शोधतो कोणाला
सोवळे नेसून पळस वेचतो
पाने आपुली द्रोणाला
कुणी शिंपडले अत्तर येथे
थंडी गुलाबी कुंद कुंद
बघता बघता सकाळ झाली
उगवताच सूर्य लालबुंद

— विनायक आभाळे

Avatar
About विनायक विठोबा आभाळे 1 Article
मी मराठी विषयाचा प्राध्यापक असून मला लेखनाची आवड आहे .मी दोन अंकी नाटक ( कॉलेजच कार्ट ) लिहिलेले असून त्याचे व्यावसायिक रंगमंचावर प्रयोगही झालेले आहेत. एक कवितासंग्रह (काव्यधारा) प्रकाशित झालेला आहे. याशिवाय तीन एकांकिका लिहिलेल्या असून विविध स्पर्धांमध्ये त्याचे प्रयोगही झालेले आहेत. तसेच दैनिक सकाळने सुरु केलेल्या Nie पाक्षिकामध्ये मी वर्षभर ' नाटयछटा ' हे सदर लेखन केले आहे.

1 Comment on सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..