कुणी उधळला क्षीतिजावरती
रंग केशरी हा सांगा
मळवट भरल्या उंच टेकडया
कुठे निघाल्या पर्वत रांगा
भिरभिरणारे पंख चिमुकले
का उधळले चौखूर
कुशीत घेऊन आभाळ सारे
पक्षी उडाले दूर दूर
झाडे वेली होऊनी जागी
फुले कुणाला वाहतात
हिरवी हिरवी तृणपाती
अजूनी दवाने नाहतात
उंचावूनी मान आपुली
माड शोधतो कोणाला
सोवळे नेसून पळस वेचतो
पाने आपुली द्रोणाला
कुणी शिंपडले अत्तर येथे
थंडी गुलाबी कुंद कुंद
बघता बघता सकाळ झाली
उगवताच सूर्य लालबुंद
— विनायक आभाळे
अप्रतिम