सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता माणसाचे सहजसुलभ जगणे कसे अवघड करते याविषयी विचार मांडला.
ग्रामीण माणसाचे दुःख किती गहिरे असते हे त्यांची कथा वाचून समजते. त्यांच्या कथेत दुःखांनी घेरलेली माणसे येतात. गरिबीतून बाहेर पडता येत नाही, मृत्यूचे सावट सतत असते, अकाली वैधव्यामुळे संघर्ष निर्माण होतो आणि संकटांना टाळता येत नाही, अशा हवालदिल जीवनाचा उलगडा त्यांच्या कथा करतात. एकूणच दुःखांनी बांधून टाकणाऱ्या माणसांची अस्वस्थ करणारी कथा सखा कलाल लिहितात. त्यामधील संवाद हे वाचकांना चिंतनशील बनवतात. ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह त्यांनी ‘पार्टी’आधी प्रसिद्ध केले. त्यातल्या ‘ढग’ला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार लाभला, तर ‘सांज’ला ते ज्या विद्यापीठात शिकले, त्याच विद्यापीठात क्रामिक पुस्तकाचा दर्जाही मिळाला. कलालांचं लेखन त्याउप्परही सुरु होतंच.
विविध नियतकालिकांतून कलालांनी लेख लिहिले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे ‘पार्टी’. हे फावल्या वेळचं लेखन नव्हे, हे स्पष्ट होतंच पण लेखकाची त्यामागची आंतरिक तळमळही जाणवत राहते. लेखनातला नितळ आत्मपर भाव आणि त्यांची घटना- प्रसंगांच्या निवेदनाची समर्थ शैली हळुवार बोचकारे घेत वास्तवाचं भान देत जाते, संस्कारांचं दर्शन घडवीत जाते आणि जगण्याचं वेगळं भान आणि अर्थ देऊन जाते. एक चांगला, विचारगर्भ लेखसंग्रह वाचल्याचा आनंद ‘पार्टी’ देत राहतो.
सखा कलाल यांच्या ‘सांज’ या कथासंग्रहातील ‘नीती’ ही कथा वाचकांना अस्वस्थपणाचा अनुभव देते. समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply