सखी मज सांग,
तो राजकुमार कोण,
उंच सरळ धिप्पाड,
बघ हाती धनुष्यबाण,–!!!
सखी मज सांग,
जमला समूह आगळा,
हा त्यातला, पण वेगळा,
रूप देखणे नीलवर्णा,
आला मजसी विवाह करण्या,–!!
राजकुमार सगळे जमले, सगळ्यात उठून दिसे हा,
मज तो शांत वादळ भासे,
नुसते बघून पुरुषोत्तमा,–!!!
वाटे मज तो निर्भय निडर,
जणू शिव शंभूचा अवतार,–
उठला तो अगदी सत्वर,–
शिव धनु पेलण्या तत्पर,–!!!
बघता बघता ते उचलत,
सर्व येथले “””आहा–अचंबित, केली सर्वांची मती कुंठित,
तातही माझे किती चकित,–!!!
मोडले ते मध्ये काडकन्,
कोण हा तडफदार तरुण,–?
नायक बनला समूहातून ,
का मुनी हासतीअसे गालात,-?
मघाशी लंकेचा राजा रावण,
पडता खाली हसले खुदकन,
तुलना कर बघ दोघांत,–
सखी वर्णन करून मज सांग,–!!!
बघ तात किती आनंदित,
जनकराजे अगदी सद्गदित,
सखी धडधडते ग माझे हृदय,
सखी मज सांग,–!!!
हाच योग्य म्हणती वर,
लागणार आता स्वयंवर,
डोळ्यात मावेना त्याची मूर्त, आवडला मज माझा प्रिय,–!!!
करत पापण्यांची पीट -पीट,
उभी बघा मी कशी अवगुंठत,
अशी कशी बघ लाजत बुजत, माझीच लागेल भाग्या दृष्ट,–!!!
सखी मज सांग,–
*ते तर अयोध्येचे राघव,
बघ संयम अन मार्दव,
उचंबळत सारे तनमन,
बघती, हळूच स्मित करत,
सखे, आता काय करू सांग*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply