नवीन लेखन...

साक्षात्कार

तो पाच वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. सोळाव्या वर्षी त्याची शाळा सुटली. सतरा ओलांडेपर्यंत त्याच्या चार नोकऱ्या सुटल्या होत्या. अठराव्या वर्षी त्याने लग्न केले.

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला.

त्यानंतर त्याने विमा एजंटचे काम हाती घेतले. त्यातही तो अपेशी ठरला. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्याला मुलगी झाली. परंतु पुढच्याच वर्षी त्याची बायको त्याला सोडून गेली. जाताना त्यांच्या मुलीलाही घेऊन गेली.

त्यानंतर त्याने एका छोट्या हॉटेलात स्वयंपाक्याचे आणि भांडी धुण्याचे काम धरले. तिथेच तो अनेक वर्षे राहिला.

दरम्यान त्याने आपल्या मुलीच्या अपहरणाचा डाव रचला. त्यातही तो अपयशी ठरला. मात्र या निमित्ताने त्याने आपल्या बायकोचे मन त्याच्याकडे परत येण्यासाठी वळविले.

निवृत्त झाल्यावर त्याला शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्ग एक पाच डॉलर्सचा चेक मिळाला. स्वतःचा सांभाळ करण्यासाठी. आता माझ्यावर अशी वेळ आली आहे की माझ्या देशाला मला उर्वरित आयुष्यासाठी पोसावे लागणार आहे. या विचाराने हा माणूस म्हणजेच कर्नल सॅन्डर्स एवढा निराश झाला की त्याने आत्महत्या करायचे ठरविले. एका झाडाखाली बसून त्याने आपल्या अपयशाची कहाणी लिहून ठेवण्याचे योजिले. अचानक त्याला वाटले आपण या अपयशी आयुष्यात काय काय करु शकलो असतो ते लिहीणे अधिक महत्वाचे आहे. ते लिहायला घेतल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याला आयुष्यात बरेच काही करता आले असते.

त्याला माहित होते की त्याच्यासारखे स्वादिष्ट चिकन कोणीही बनवू शकत नसे. त्याला आठविले की अनेक वर्षे त्याने ज्या हॉटेलमध्ये स्वयंपाक्याचे काम केले होते तेथे त्याने बनविलेले चिकन गिऱ्हाईकांना फार आवडायचे. त्याच्या मनात एक कल्पना आली. चेकच्या पैश्यांतून ८७ डॉलर्स काढून त्याने चिकन विकत घेतले आणि स्वतःची पाककृती वापरुन त्याने ते चिकन स्वत: बनविले. त्यानंतर त्याच्याच घराशेजारच्या गल्ल्यांमध्ये घरोघरी जाऊन त्याने ते विकले. सगळे चिकन हातोहात खपले. त्यानंतर त्याचा एक मोठा ग्राहकवर्ग निर्माण झाला. त्याचे चिकन एकदा खाल्यानंतर ग्राहक त्या चिकनची पुन्हा पुन्हा मागणी करु लागला.

वयाच्या ८८व्या वर्षी सॅन्डर्सने केंचुकी फ्राईड चिकन (KFC) या कंपनीची स्थापना केली. त्याचे चिकन जगभर विकले जाऊ लागले. त्यावर्षी तो अरबोपती झाला. आजही या कंपनीचे चिकन जगभर लोकप्रिय आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये त्याचे अस्तित्व आहे.

माणसाचे नशीब कधी आणि कसे बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्या अपयशाकडे तटस्थतेने पाहून आपण आपली शक्तीस्थळे शोधायला हवीत. आपले आयुष्य किती आहे हे आपल्याला माहित नसते. मग त्या वेळात आपण आपल्या बलस्थानांचा उपयोग करुन काहीतरी सकारात्मक घडविणे आवश्यक आहे. आपली अॅटीट्यूड म्हणजेच आपल्या जीवनाकडे, आपल्या प्रश्नांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. तरच आपण सकारात्मक आणि उर्जा देणाऱ्या गोष्टींकडे आपेआप वळतो. जसा हा कर्नल आयुष्यभर अपयश पचवत राहिला. मात्र मरणाच्या क्षणी त्याला त्याच्या सामर्थ्याचा साक्षात्कार झाला. तसा तो तुम्हा आम्हालाही होवो.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..