तुझ्या अंगणात जाईजुईचे गं सडे
मन दुखे का गं सखे का गं झाले पाहून वेडे
कळ उठे अंतरीही दावू कशी उघडून
तुझ्या अंगणाचा हेवा कशी सांगू उलगडून
सारे वाटे मज हवे, पर कसे ते मिळावे
काटेरी च्या बना आम्ही सदोदित जगावे
सुंगधाही पारखी मी, वाटेत काटेच काटे
वेल लावू कुठे गं हा, ज्यात परिमळ दाटे
वाटे, नटावे, सजावे, ध्यानी मनी हासावे
मुक्त फुलून यावे सुगंधा या घेऊन
कसा करू शिनगार, कुणासाठी दावू रूप
किती वसंत हे गेले रानोमाळ भटकून
— वर्षा कदम.
Leave a Reply